Stunts | Aaplaa Vyaaspith news

Friday, January 17, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

स्टंट

स्टंट

आज टपावरती स्टंट करी टपोरी
बालका आई रे तुझी वाट पाहते घरी !

तो टपोरी बेफिकीर उभा राहतो
हिरो समजुनी खुशाल मस्तीत पाहतो
मूर्ख चाळ्यांनी, स्वताच फसतो
क्लिप काढुनी स्वताची अन होतो फरारी

सांग पालकास आज, काय जाहले ?
धडे संस्काराविना, त्याला सोडले
बुर्या संगतीस वळण, सुपुत्रा लागले !
सुखरूप परत्शील, चिंता मज भारी !

त्या तिथे वायरीला कसा चिकटला
वाचविन्या त्याला, नाही वेळ भेटला
राख झाली क्षणात, ढगात पोहचला
ओढवून घेतले संकट, सोडली हो पायरी
@ गजाभाऊ लोखंडे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts