Rescue bandya | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

सोडवणूक बंड्याची

सोडवणूक बंड्याची

बायकोच्या कटकटीने, बंड्या भरडला
स्वप्नात स्वतःच्या, भलताच रडला
देवाने सांगितले,
“मिजासीने दाखविलीस ना लोकांना सीडी
सांगतो तुलाच फक्त, सुखाची शिडी
तेव्हापासून
लग्नाची सी डी तो शेवटून पाहतो
वरातीचा घोडा, कसा माघारी धावतो
सप्तपदी तो , उलट दिशेने चालतो
बायकोच्या गळ्यातला हार, पटकन काढतो

गाठ शेल्याची, बांधनारेच काढती
अक्षता उलट्या , माघारी उडती
वऱ्हाड आलेले, मागे फिरती
आहेर पाहुण्यांचे, पुन्हा हाती

मेकअप उतरवुनी, दोघांचा चेहरा
उलट्या पाउलाने, सुखाने घरा

@ कवी – गजानन लोखंडे – नवी मुंबई

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts