Mumbai Local | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

मुंबई लोकल

मुंबई लोकल

रोज रोज मरे, 
तर कोन हो रडे

तांत्रिक बिघाड परे,
आज गोरेगावकडे

९ डब्याचे, जाहले १२ 
अन बारावरून, केले पंधरा 
लोकल मध्ये चढायला 
धजत नाय उंदरा

जर आलीच तुम्हा चक्कर 
अन विरार पकडाल लोकल 
अलगद तुम्हा धरतील सारे 
पडणार नाही तुम्ही बिलकुल

उन्हाळ्यात घाम पुसाया 
मिळेल पुढच्याच शर्ट 
रोज मसाज गर्दीत या 
सुखरूप राहील हार्ट

गाडी मधुनी उडी मारायचे 
शिकायचे असते तंत्र 
उतरना है क्या भय्या 
ढकलत म्हणायचा मंत्र

भजन मंडळीचा आवाज 
मानून घाव्या गोड 
पत्तेवाले आपल्याच नादात 
जुनी पुराणी खोड

विक्रेत्यांचा असतो अड्डा 
भिकार्यांचे हे माहेरघर 
हात धुतात सारेच जन 
मिळताच कुणी पाकीटमार

क्रोस्सिंग करती काहीजन 
शोर्टकट होतो जीवनाचा 
होई ट्रेन लेट जरासी 
वेळ गेला फुकाचा

कुणी बसुनी टपावरती 
स्टंट कराया कसे धजती 
अलगद चिटके वायरीस 
राख तयाची, क्षणात उरती

@ गजाभाऊ लोखंडे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts