Tennis cricketers to play in Ratnagiri, Raigad and Rest of Maharashtra meet | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

रत्नागिरीत रंगणार टेनिस क्रिकेटचा थरार, रायगड व रेस्ट ऑफ महाराष्ट्र भिडणार आमनेसामने

रत्नागिरीत रंगणार टेनिस क्रिकेटचा थरार, रायगड व रेस्ट ऑफ महाराष्ट्र भिडणार आमनेसामने

कॅबिनेट मिनिस्टर व शिवसेनेचे नेते उदय सामंत पुरस्कृत रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२० मध्ये होणार टेनिस क्रिकेट विश्वातील एक वेगळी लढत

रत्नागिरी: टेनिस क्रिकेट विश्वात नेहमीच आगळेवेगळे प्रयोग करण्यास प्रसिद्ध असलेल्या कॅबिनेट मिनिस्टर व शिवसेनेचे नेते ना. उदय सामंत पुरस्कृत रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२० मध्ये आज एक वेगळी लढत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. टेनिस क्रिकेटची पंढरी असलेला रायगड विरुद्ध उर्वरित महाराष्ट्र (रेस्ट ऑफ महाराष्ट्र) अशी पर्वणी ना. उदय सामंत टेनिस क्रिकेट शौकिनांसाठी घेऊन येत आहेत.. रायगड वि. ठाणे अशी लढत प्रेक्षकांनी आजवर पहिली आहे. अश्यातच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२० महाराष्ट्रातील बड्या खेळाडूंना एकत्र आणण्याचा मानस यावेळेस करण्यात आला आहे.
दरम्यान, या स्पर्धेत नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात आल्यानंतर स्पर्धेचे आयोजक ओम साई स्पोर्ट्सने या प्रेक्षणीय सामन्याचे आयोजन केले आहे. ओम साई स्पोर्ट्सचे दीपक पवार यांनी या सामन्यासाठी कसून मेहनत घेतली असून सामन्याचे प्रायोजक राजापूरचे प्रसिद्ध उद्योगपती अशफाकशेठ हाजू हे आहेत. विजेत्या संघाला रोख रक्कम रुपये २२,२२२ तर उपविजेत्या संघाला रोख रक्कम रुपये ११,१११ तसेच आकर्षक चषक अशी इनामराशी मिळणार आहे. हा सामना युट्युबवर टेनिसक्रिकेट (डॉट) इन च्या माध्यमातून रात्री ९ वाजता थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts