Quorum Mall hosts West Indies cricketers | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

कोरम मॉलने वेस्ट इंडीजच्या क्रिकेट दिग्गजांना केले होस्ट

कोरम मॉलने वेस्ट इंडीजच्या क्रिकेट दिग्गजांना केले होस्ट

एव्हिन लुईस, निकोलस पुरान आणि शरफेन रुदरफोर्ड हे क्रिकेटींग प्रख्यातना भेटून फॅन्स झाले उत्साहित

मुंबई, नोव्हेंबर २९, २०१९: वेस्ट इंडीज क्रिकेटचे प्रसिद्ध स्टार एव्हिन लुईस, निकोलस पूरान आणि शरफेन रुदरफोर्ड यांनी कोरम मॉलला भेट दिली. या दिग्गजांना पाहण्यास आलेल्या उत्साही फॅन्स आणि अभ्यागतांनी मॉलमध्ये एकच गर्दी केली होती. टोटल स्पोर्ट्स अँड फिटनेस आणि एस.एस. बॅट्स यांच्या सहकार्याने या क्रिकेट दिग्गजांनी आपली उपस्थिती येथे लावली.

एक जबाबदार समुदाय केंद्र म्हणून कोरम हे त्याच्या चाहत्यांसाठी अविस्मरणीय क्षण तयार करण्यात नेहमी अग्रणी असते. क्रिकेट चाहत्यांसाठी हा कार्यक्रम खरोखरच अविस्मरणीय होता. खेळ, तंदुरुस्ती आणि आरोग्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने क्रिकेटर्सनी प्रेक्षकांशी संवाद साधला आणि त्यांचा प्रवास आणि यशोगाथा शेअर केली. क्रिकेटर्सनी फॅन्सच्या स्पोर्ट्स गिअर (बॅट) वर ऑटोग्राफ देखील दिले.

भारत, असा देश जेथे खेळाडुंची पूजा केली जाते, क्रिकेटर्स सह सुसंवादाने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. फॅन्स त्यांच्या आवडत्या क्रीडापटूंसोबत फोटो क्लिक करताना आणि ऑटोग्राफ घेतानाही आढळले. अशा प्रकारे एक अविस्मरणीय कार्यक्रम पाहण्यास मिळाला ज्याने मॉलच्या चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील चांगला क्षण अनुभवायला मिळाले असल्याने विस्मित केले.

यावेळी बोलताना कल्पतरू लिमिटेडचे ​​रिटेल हेड श्री. देवा ज्योतुला म्हणाले, “थीम-आधारित कार्यक्रम आयोजित करण्याचा हेतू प्रेक्षकांपर्यंत संदेश पोहोचवणे आहे, जे जीवनशैलीचा एक भाग म्हणून त्यांनी आपल्या मनात बिंबवावे. आम्ही देशाच्या तरूणांना आणि पुढच्या पीढीला जीवनात यशस्वी वृत्ती विकसित करण्यास प्रेरणा देण्यासाठी स्टार्सच्या जीवनात लक्ष घातलेला असा कार्यक्रम आयोजित केला.”

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts