India's third T20 -match win over Windies, also won the series | Aaplaa Vyaaspith news

Friday, January 17, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

भारताचा तिसऱ्या टी २० सामन्यात विंडिजवर दणदणीत विजय,मालिकाही जिंकली

भारताचा तिसऱ्या टी २० सामन्यात विंडिजवर दणदणीत विजय,मालिकाही जिंकली

मुंबई: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आजच्या निर्णायक टी-२० सामन्यात विडींजचा कर्णधार पोलार्डने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. मात्र, विंडीजचे गोलंदाज काहीच प्रभाव दाखवू शकले नाहीत. पहिल्या विकेटसाठी ११.४ षटकांत १३५ धावांची भागिदारी रचली. रोहित शर्मा ३४ चेंडूंत ७१ धावा करून बाद झाला. विराटने अवघ्या २९ चेंडूंत ७० धावा कुटल्या. त्यात ४ चौकार आणि ७ खणखणीत षटकारांचा समावेश होता. राहुलनेही सुरेख खेळी केली. मात्र त्याचं शतक थोडक्यात हुकलं. राहुलने ५६ चेंडूंत ९१ धावा केल्या. भारताने निर्धारित २० षटकांत ३ बाद २४० धावांचा डोंगर उभारत विंडीजपुढे विजयासाठी २४१ धावांचे लक्ष्य ठेवले 

विंडीजच्या डावात कर्णधार किरॉन पोलार्डने अर्धशतकी खेळी करत सर्वाधिक ६८ धावा केल्या. शॅमरॉन हेटमेयरने ४१ धावा करत त्याला चांगली साथ दिली. मात्र विंडीजच्या अन्य फलंदांजांना आपली चमक दाखवता आली नाही. भारताच्या प्रभावी माऱ्यामुळे सुरुवातीपासून विंडीजचा संघ बॅकफूटवर गेला.

भारताने दिलेल्या २४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा संघ निर्धारित २० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १७३ धावांपर्यंतच मजल मारू शकला.विंडीजच्या डावात कर्णधार किरॉन पोलार्डने अर्धशतकी खेळी करत सर्वाधिक ६८ धावा केल्या. शॅमरॉन हेटमेयरने ४१ धावा करत त्याला चांगली साथ दिली. मात्र विंडीजच्या अन्य फलंदांजांना आपली चमक दाखवता आली नाही. भारताने तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडिजवर ६७ धावांनी दणदणीत विजय मिळवत तीन सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आहे. 

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts