Breaking News

शेव

शेव

साहित्य: –
४ वाट्या बेसन,
पाव वाटी ओवा,
मीठ चवीनुसार,
१ चमचा हळद,
३ चमचे मिरची पावडर,
२ चमचे तेलाचे मोहन,
तळण्यासाठी तेल, इ.

कृती:-
एका भांड्यात ओवा घेऊन त्यामध्ये २ वाटी पाणी घालून १० मिनिटे मध्यम आचेवर उकळून थंड झाल्यावर गाळणीने गाळून घ्या.
बेसनामध्ये तेलाचे मोहन घालून मीठ, हळद, मिरची पावडर घालून एक जीव करून घ्यावे.
नंतर यामध्ये ओव्याचे गाळलेले पाणी घालून गरज लागल्यास दुसरे साधे पाणी घालून मळून घ्यावे.
शेवेच्या साच्याला आतून तेलाचा हात लावून त्यामध्ये मळलेले पीठ भरून उकळलेल्या तेलातच गॅस मंद करून शेव गाळावी आणि मध्यम आचेवर एक वेळा परतून चांगली तळून घ्यावी.
साधारण तापमानाला आल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये भरून ठेवावी.

टीपः- दिवाळीचे हे पदार्थ ८-१५ दिवस तरी सहज राहतातच…सूर्यफूल तेल किंवा इतर तेलात तळले की ४ दिवसांनी एक वेगळाच वास पदार्थाला येऊ लागतो आणि मग तो खायला नको वाटतो. म्हणून शक्यतो शेंगतेलात हे पदार्थ करावे …वास नाही येत,पदार्थ शेवटपर्यंत छान राहतो.

@ज्योती जाधव.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!