
साहित्य :-
2 वाटी कणीक,
पाव वाटी पांढरे तिळ,
1 टे.स्पून जिरे पावडर,
1 टी स्पून ओवा,
1 टी स्पून हळद,
मीठ आणि मिरची पावडर चवीनुसार,
तळण्यासाठी तेल, इ.
कृती :-
कणीक एका सुती कपड्यात गाठोडे बांधून कुकरला एक शिट्टी काढू घ्यावी.
कुकर थंड झाल्यानंतर गाठोडे सोडून कणीक काढून घ्यावे, गाठी झाल्या असल्यास मिक्सरवर एकसारखे करून घ्यावे.
एका परातीमध्ये कणीक काढून त्यामध्ये तीळ, जिरे पावडर, ओवा, हळद, मीठ, मिरची पावडर घालून पाण्यात मळून घ्यावे.
साच्यात पीठ घालून चकल्या पाडून मध्यम आचेवर खमंग तळून घ्याव्या आणि थंड झाल्यावर डब्यामध्ये भरून ठेवाव्या.
@ ज्योती जाधव,

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com