Breaking News

चवडा(चौघडी)

चवडा(चौघडी)

हा पदार्थ बेळगाव भागात खूप प्रसिद्ध आहे.

साहित्य :-
4 वाट्या मैदा,
2 वाटी सुके खोबरे किसून घेतलेले,
1 1/2 वाटी साखर दळलेली,
पाव वाटी खसखस,
पाव वाटी तीळ,
तेल तळण्यासाठी,
1 टे.स्पून वेलचीपूड,
पाव टे.स्पून मीठ, इ.

कृती :-
सुके खोबरे, खसखस, तीळ चांगले भाजून घेऊन, हे सर्व थंड झाल्यावर या सर्वात दळलेली साखर, वेलचीपूड घालून मिश्रण एकजीव करून सारण बनवून ठेवावे.
अर्धी वाटी मैदा बाजूला काढून उरलेल्या मैद्यात थोडे कडकडीत मोहन घालून नंतर पाव टे.स्पून मीठ घालून पाण्याने मळून घेऊन अर्धा तास ती कणीक तशीच झाकून ठेवावी.
नंतर पापड लाटायला गोळे बनवतो तसे गोळे करून पापडा एवढ्या  पाती लाटून घ्याव्यात.
तेल तापले की, तेलात एक पात टाकून दोन्ही बाजूने तळून घेऊन ती ताट पालथे ठेवून  त्यावर ती पात ठेवावी.
ती गरम असतानाच तिच्यावर तयार सारण एक टे.स्पून पसरवून घालावे, पातीला अर्ध्यातून घडी घालून पुन्हा त्यावर थोडे सारण घालून पुन्हा अर्ध्यातून उभी  घडी घालावी …हा एक तयार झाला चवडा…पोळी घडी करून पानात वाढतो त्यासारखा आकार चवड्या असतो.
मग त्यानंतर दुसरी पात तळायला घ्यावी….

टीप :-
हा पदार्थ चवीला करंजीसारखाच लागतो. करंजी करणे हे खूप कष्टाचे आणि कटकटीचे काम आहे……पात गरम असतानाच घडी घालावी कारण तेव्हा ती नरम असते, थंड झाल्यावर घडी घालताना तुकडे होतात आणि सारण सांत रहाते.

@ ज्योती जाधव.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!