Breaking News

भाजणीची चकली

भाजणीची चकली

साहित्य:-
1 किलो हरभरा डाळ,
1/2 किलो तांदूळ,
100 ग्रॅम धने,
50 ग्रॅम जीरे,
तीळ पाव वाटी,
ओवा पाव वाटी,
मीठ चवीनुसार,
हळद 2 चमचे,
4 चमचे मिरची पावडर,
4 चमचे तेल फोडणीसाठी,
शेंगतेल तळण्यासाठी, इ.

कृती:-
प्रथम हरभरा डाळ, तांदूळ, धने, जीरे हे कढईत वेगवेगळे भाजून थंड झाल्यावर एकत्र करून गिरणीतून दळून आणावे.
एका मोठ्या पातेल्यात 4 चमचे तेल गरम करत ठेवून नंतर त्यामध्ये मिरची पावडर घालून चार वाट्या पाणी घालून उकळी आणावी. उकळी येताच मीठ, हळद, तीळ, ओवा घालावा दोन मिनिटांनी त्यातच भाजणी घालून गॅस बंद करून रवीने ढवळून झाकण लावून 15 मिनिटे ठेवावे.
हे मिश्रण परातीत काढून गरज असेल तर थोडे पाणी घालून घट्ट मळून घ्यावे.
तेल कढईत तापत ठेवून साच्याला आतून तेलाचा हात लावून त्यामध्ये पीठ भरून चकल्या पाडाव्या आणि मध्यम आचेवर तळून थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्या.

@ज्योती जाधव.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!