Water is life 02 | Aaplaa Vyaaspith news

Sunday, August 18, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

जल हेच जीवन ०२

जल हेच जीवन ०२

घरातल्या बेसिनचं पाणी
हव तसं भसाभसा वापरायचं
आणि वर वर सगळ्यांनीच म्हणायचं
जल हेच जीवन आमचं …
व्यासपीठावर पुढाऱ्यांनी
पाण्यावर घसा ताणून ओरडायचं
घरी आल्यावर मात्र ऐटीत
शॉवरखाली तासभर भिजायचं …
आणि वर वर सगळ्यांनीच म्हणायचं
जल हेच जीवन आमचं …
पुण्यामुंबईला पाणी दिवसातून
दोन दोन तास पुरवायचं
आणि जीव कंठात आल्यावर
मराठवाड्याला रेल्वेनं पाणी पुरवायचं
एकाला तुपाशी न एकाला उपाशी
असलं धोरण सरकारचं
आणि वर वर सगळ्यांनी म्हणायचं
पाणी हेच जीवन आमचं ….
अर्धा ग्लास पिऊन
पाणी बाकीचं फेकून द्यायचं
नळ बारीक सोडून कधीचं
काम करणं आम्हाला नाय जमायचं
आणि वर वर सगळ्यांनी म्हणायचं
जल हेच जीवन आमचं …
काँक्रीटच्या जंगलीकरणापायी
वृक्ष,झाडं तोडून टाकायचं
आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या चर्चेत
पुढं,हिरिरीनं सामील व्हायचं
आणि वर वर सगळ्यांनी म्हणायचं
जल हेच जीवन आमचं …
मराठवाडा विदर्भाच्या प्रश्नावर
डोळ्यात पाणी आणून रडायचं
पाणी वळवायची वेळ आल्यास
पाणी वादात आमचं आमचं करायचं
आणि वर वर सगळ्यांनीच म्हणायचं
जल हेच जीवन आमचं …
सोनं नानं देऊन सुद्धा
आता पाणी नाही मिळायचं
पाण्यालाच पाण्यासारखा
आता खर्च करत बसायचं
आणि वर वर सगळ्यांनी म्हणायचं
जल हेच जीवन आमचं …
हवं तेवढं पाणी आता
साठ्यातून उपसायचं
एक ग्लास तरी दिवसातून
पाणी आता वाचवायचं
तर आणि तरचं म्हणायचं
जल हेच जीवन आमचं …
गावाकडच्या लोकांकडं
आता माणूस म्हणून बघायचं
आलेलं तुफान आता
सगळ्यांनी मिळून शमवायचं
मग अभिमानानी सगळ्याला सांगायचं
होय ..जल हेच जीवन आमचं …

@ हर्षदा जोशी ,पुराणिक

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!