‘जल हेच जीवन’ ०१

‘जल हेच जीवन’ ०१

थेंब थेंब पाण्यासाठी,
माऊलीचा आटापिटा ।।
भरेना कधी माठ-रांजण,
किती घालूनीया खेटा ।।

थेंब थेंब पाण्यात कसं,
महत्त्व जीवनाचं दडलयं ।।
केल्याने छळ निसर्गाचा,
दर्शन दुष्काळाचं घडलयं ।।

घोटभर पाण्याच्या शोधातं,
मायमाऊली फिरे अनवाणी ।।
ओळखूनी भविष्यातला धोका,
थेंब थेंब वाचवा रे पाणी ।।

जल हेच की जीवन,
आहे जीवनाचं रे सत्त्व ।।
अरे जाण रे माणसा,
थेंब थेंब पाण्याचं महत्त्व ।।

थेंब अन् थेंब पाण्याचा,
आता जमिनीत जिरवा ।।
पाळाल हा मंत्र तरचं,
राहील जीवनात गारवा ।।

✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!