Valentine's Day | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

व्हॅलेंटाइन डे

व्हॅलेंटाइन डे

त्यादिवशी अशीच
मी माझ्यात गुंग होऊन गेले
पूर्वीची सोनसळी चित्रफीत
नजरेसमोर आली…
तुझ्या प्रेमात मी…
माझ्या प्रेमात तू…. ¡
धुंद मधुगंध दरवळू लागला
कधी खिडकीतून…
कधी चिकाच्या पडद्याआडून..
निळ्या आभाळातला चंद्र कसा लपंडाव खेळतो…
अगदी तस्साच…
तुझा आणि माझा
नजरेचा खेळ..
तनामनावर
मोहरुन जायचा… ¡
चाफ्याच्या धुंद गंधाने
दरवळलेल्या अंगणात…
चांदण्याचा पाऊस अंगावर घेत
अनिमिष…
अनुरुक्त…
एकमेकात विरघळलेले आपण..
नकळत हात हाती गुंफून जायचे
त्या रेशमी स्पर्शाने गात्रात वीज खेळून जायची… ¡
अचानक……….
हळूवार स्पर्शाने मी दचकले
समोर तू उभा… ¡
तुझ्या नजरेत तीच…
गोड गुलाबी खेळकर छटा..
माझ्याही नकळत
मी तुझ्या उबदार प्रेमळ मिठीत. ..
कधी सामावले
कळलच नाही….

@ सौ सुनीता अशोक भालेराव

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts