"The mind Katta " | Aaplaa Vyaaspith news

Sunday, August 18, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

“मनातला कट्टा “

“मनातला कट्टा “

बागेमध्ये आज मी फुले वेचतो आहे
काटा नाही मज गुलाब टोचतो आहे

माझ्या दुःखाला पाहून वनात लबाड
आनंदाने आज हा मोर नाचतो आहे

काळाने घातले किती औषध पाणी
तरी हा दुःखाचा बिबा काचतो आहे

सुख तरंगते वर खोल तळ्यामध्ये
आठवणींचा तो गाळ साचतो आहे

श्रावणातली भावे हिरवळ साऱ्यांना
कोमेजल्या पानांना कोण वाचतो आहे

हर्षदा जोशी ,पुराणिक

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!