The husband is… | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

नवरा म्हणजे …

नवरा म्हणजे …

लहरी वारा
कधी मनाला सुखवणारी 
हलकीशी झुळूक
तर कधी कानाशी 
घोघावणारा वादळी वारा
कधी कधी रिमझिम पाऊस
तर कधी तनमन
झोडपणाऱ्या पाऊसाच्या गारा
कधी इंद्रधनुची कमान
सप्तरंग जीवनात फुलवणारा
तर कधी गडद ढग आकाशीचा
गडगडाटासह घाली थैमान
करी मार्दवाचा अमृत शिडकाव
तर कधी भोलेनाथासम तांडव
तर कधी तळपणारा सुर्य
आयुष्याला अर्थ देणारा
कधी चंद्राची छाया शितल
ममतेने मज जपणारा
निसर्गाची ही अजब किमया
सखीसह संसारी रमतो राया!

@ सुनीला मोहनदास

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts