Tell Na Devbappa ...! | Aaplaa Vyaaspith news

Friday, January 17, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

सांग ना देवबाप्पा…!

सांग ना देवबाप्पा…!

सांग ना देवबाप्पा
ही मोठी लोकं अशी का वागतात…
सगळ्यांशी प्रेमाने बोलायचं बरं का!
रोज मला शिकवतात…
मग अनोळखी व्यक्तींशी नाही बोलायचं
असे का बरं सांगतात….?

आई-बाबा ठरवतील तिकडे घेऊन मला जातात
पण, मला जिथे जायचे तिथे का अडवतात..?

बाहेर कुणी खाऊ दिला
तर घेऊन नको सांगतात
आणि घरी कुणी आले
की खाऊ घ्यायला होकार मात्र देतात…

हे नको करू, ते नको करू
अस्स नको बसू, तस्स नको बसू
इकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ
सतत उपदेश देत असतात
पण हे जग किती सुंदर आहे
हे मोठी माणसं का विसरतात…?

देवबाप्पा सांग ना..!
ही मोठी माणसे अस्स का वागतात..?
तू सांगतोस की मलाच शोधावे लागेल
ह्या प्रश्नांची उत्तरं
कारण
मला पण बागडायचं आहे,
मनासारखं जगायचं आहे

पण मी मोठी होइपर्यंत
उशीर तर नाही होणार ना…?
देवबाप्पा सांग ना!

©®प्रतिक्षा कांबळे (psb)

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts