Raksha Bandhan | Aaplaa Vyaaspith news

Sunday, August 18, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

रक्षाबंधन 

रक्षाबंधन 

बहिण भावाच्या मधुर मायेचा 
रेशमी बंध हा निरलस प्रेमाचा
सण नितळ उत्कट भावनांचा 
सोहळा रंगला अतूट नात्याचा 

अवीट बंधनाचा दिन आगळा
बहिणीच्या हळव्या भावनांचा 
भावाच्या आत॔ प्रेम वर्षावाचा
रक्षाबंधनाचा सण पावित्र्याचा 

भगिनीच्या मनी बंधुचा लळा
रेशमी धाग्याने हातही सजला
उरात अभिमान भरून आला
तुझ्या रूपात द्रौपदीचा सखा

कवतिकेचा माझा भाऊराया
राखीचा अनमोल पाठीराखा
राखी बांधून ओवाळीते तुला
असाच राहो नात्यात गोडवा

मिलिंद कल्याणकर
नेरूळ, नवी मुंबई

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!