Rain in your heart | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

तुझ्या मनातला पाऊस

तुझ्या मनातला पाऊस

तुझ्या मनातला ओला पाऊस
माझ्या मनात गंधाळला
धुंदगंध होऊनी रानोमाळ
पानोपानी पाचू बहरला

पवनाचे शीतल गोड गुंजन
गंध धुंदीत सागरतीरी गेला
गिरीशिखरांमध्ये गुंगून गुंतला
पाऊस धुक्यात फेसाळला

तुझ्या नयनी पावसाची धुंदी
उधाण आले तनामनाला
चमकली सौदामिनी अन
पाऊस असा कोसळला

सौ सुनीता अशोक भालेराव

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts