Morning light | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

प्रभात गगन

प्रभात गगन

प्रभातीच्या निरभ्र निल आसमंती
पक्षी स्वच्छंद तरंगे पंख पसरूनी
जलाशया किनारी झाडी बहरली
गिरीरांग पसरली दिमाखात तिरी

धवल करांनी उजळवली उगवती
पानांतुनी किरणे भूवरी झेपावती
हरित तृणात रंगीत फुले उमलली
तरूतळी रेखाटली पुष्प रंगावली

उजळविले सुबक घरटे किरणांनी
शुभ्र रवी प्रकाशी हरित वृक्ष वेली
निसर्ग रूपडे बघुन नयन सुखावी
मृदेच्या अंगणी हिरवळ मखमली

उगवतीला उजळली प्रभात गगनी
हरित तरूंनी सुबकशी वाट नटली
कल्पतरू डोले डौलात नील नभी
कौलारू सदनांसह वाट प्रकाशली

@ मिलिंद कल्याणकर

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts