Little brother | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

धाकटे बंधु

धाकटे बंधु

घेऊन चिरनिद्रा शांत
गेलास तू अचानक
काळीज झाले पाणी पाणी
भिजल्या तव आठवणी

नानामाईंच्या सावलीत
खेळलो भांडलो बालपणी
एकत्र जमून भेटत होतो
दुरावलेल्यांच्या काढून आठवणी

गेलेले ना येती परतूनी
भेटतील का.कधीतरी
वेडी आशा जागून आहे
पुर्ण करेल कुणी स्वप्नपरी

सगळे मिळून धरु फेर
हात सुटता न् सुटे कधी
रक्षाबंधन भाऊबीज
नको चुकवूया नेम कधी.

@ सुनिला मोहनदास

हेमंत सदाशिव शिंदे (६९) (किशोर)२२नोव्हे.२०१९ टीम व्यासपीठ कडून भावपूर्ण श्रद्धांजली

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts