Breaking News

कविता ०५

कविता ०५

धरेने पांघरली शाल ही सुंदर
आल्हाददायी रुप मनोहर
वाऱ्यालाही आली लहर
मेघराजाने शिंपडले अत्तर
रविराजाने उधळला केशर
लाजूनी वसुंधरा झुकवी नजर
परि हर्षोन्मिलीत भरुन येई ऊर
खळखळून हसे कृष्णवर्णी सागर
आसमंती निनादे पक्ष्यांचा जागर
भासे अवनी स्वर्गादपी सुंदर
जणू साक्षात्कार घडवी ईश्वर !

@ सुनिला मोहनदास

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!