deva | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

देवा

देवा

ध्येय मला गाठायचंय
अजूनही मला शिकायचंय

देवा, तू साथ दे साथ दे
मनात आशा जागत आहे
ध्येयशेल फुलत आहे
देवा, तू साथ दे, साथ दे

अध्यापन मला करायचं आहे,
मनाला त्यात गुंतवायचं आहे
देवा, तू साथ दे, साथ दे

रिकामी दुपार घालवायची नाही
आळसात दिवस घालवायचा नाही

उद्योगी, उद्योगी उद्योगाची कास
मनाला त्यात गुंतवायचं खास

यशाचं उत्तुंग शिखर
मनात आहे भावना प्रखर

यशाचं शिखर गाठायचंय
यशस्वी मला व्हायचंय !!

@ सौ. नलिनी नागुरे निर्मले,
कोपरखैरणे, नवी मुंबई.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts