Border ... invisible ... | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

किनारा….दिसून न दिसणारा..

किनारा….दिसून न दिसणारा..

तो आणि ती
नदीचे एकच पात्र…
पण त्याचा किनारा वेगळा
आणि तिचा वेगळा…..
वाहत जातात
प्रवाहासोबत
वाट मिळेल तिथे….
वाहत येतो कधीतरी
कचरा त्याच्या किनाऱ्यावरचा
तिच्या किनाऱ्यापर्यंत….
ती स्वीकारते त्याला
त्या कचऱ्यासोबत….
कारण तिला माहिती असतं
त्यात त्याचा दोष नाही….
तो फक्त त्याच्याकडे आलेला निचरा
पुढे ढकलतोय….
तो ज्ञान असून अज्ञान बनतो
बघत राहतो
वाहणारया घाणीकडे…
कारण त्याला माहित असते
तिची ताकत….
ती देणार नाही थारा
लावेल तिचा जोर
आणि प्रवाहासोबत
ढकलेल तो कचरा
जो तिला अशुद्ध करतो….
तो जाणतो त्याचा किनारा….
तो जाणतो तिचा किनारा….
लांबूनच लावतो तिच्यावर जीव….
कधी खळखळून तर
कधी संथपणे…..
कोणाच्याही नकळत….
कारण….
तो तिचाच एक अंश
तिच्याच आयुष्याचा भाग…..
सर्वांना दिसून न दिसणारा….

©®प्रतिक्षा कांबळे (psb)

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts