aai 01 | Aaplaa Vyaaspith news

Sunday, August 18, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

आई ०१

आई ०१

पहिला शब्द मुखी आला  
पहिला घास भरविला 
शिक्षणाचा श्रीगणेशा 
तुझाच अधिकार पहिला  

मनातील कोपरा नकळत 
तूच व्यापुनी ठेविला 
तुझ्याच मुळे पाहिला 
ह्या सुंदर विश्वाचा पसारा

घेउनि हात आधाराचा 
ओळखले मी जगाला 
सहन करुनी यातना 
विश्व दाखविलेस मला 

तुझ्या संस्कारांचा वसा 
माझा आयुष्याचा ठेवा 
जपलेस तू तान्हुल्याला
करुनी हातांचा झोपाळा 

मारात होता जिव्हाळा 
ध्यास मम उत्कर्षाचा
रागवण्यात हि गोडवा 
अथांग सागर प्रेमाचा

@ मिलिंद कल्याणकर

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!