Villagers in Kukashet village in Navi Mumbai give way to villagers through question of parking | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

नवी मुंबईतील कुकशेत गावातील मार्केट, पार्किंगचा प्रश्न मार्गी ग्रामस्थांना दिलासा

नवी मुंबईतील कुकशेत गावातील मार्केट, पार्किंगचा प्रश्न मार्गी  ग्रामस्थांना दिलासा

शहरातील सुनियोजित पहिले गाव

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील पुनर्वसित गाव म्हणून ओळख असलेल्या नेरुळ मधील कुकशेत गावातील पार्किंगचा तिढा सुटणार आहे. नगरसेवक सुरज बाळाराम पाटील आणि नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी गावाचे गावपण जपत ग्रामस्थांना महापालिकेच्या माध्यमातून अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आरक्षित भूखंडांमुळे नियोजनबद्ध पद्धतीने वसलेल्या गावातील नागरिकांना वाहने पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेवक पाटील दांपत्याने प्रयत्न केले आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सेक्टर 14 मध्ये मार्केट आणि पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गावातील रस्ते पार्किंग मुक्त होणारे हे पहिलेच गाव ठरले आहे.
एम.आय.डी.सी.च्या औद्योगीकरणाच्या धोरणानंतर नवी मुंबईतील शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी अग्रहित करण्यात आल्या. कुकशेत गाव हे एम.आय.डी.सी. क्षेत्रात मोडत होते. सदर ठिकाणी गावाशेजारी रासायनिक कंपन्या उभारण्यास सुरुवात झाली. रासायनिक कंपन्यांमुळे जीवित हानी किवा दुर्घटना घडू नयेत यासाठी 1995 साली कुकशेत गावाचे पुनर्वसन नेरूळ सेक्टर 14 येथे करण्यात आले. लोकनेते तथा माजी पालकमंत्री गणेश नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांच्या पुढाकाराने पुनर्वसित कुकशेत गावासाठी 16 सामाजिक भूखंड पालिकेकडे हस्थांतरित करण्यात आले आहेत. नगरसेवक सुरज पाटील आणि नगरसेविका सुजाता पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुकशेत गावातील अनेक भूखंड विकसित करण्यात आले असून विधानसभा क्षेत्रातील नवी मुंबई महानगरपालिकेची पहिली इंग्रजी शाळा, हिरवळयुक्त मैदान, नागरी आरोग्य केंद्र, सुनियोजित वातानुकुलीत व्यायामशाळा, महीलासबलीकरणासाठी महीला भवन, संपुर्ण गावात मुख्य रस्त्यांवर सी सी टीव्ही यंत्रणा, बारबाला मुक्त गाव, प्रवेशद्वार यासारख्या समाजउपयोगी वास्तू, उपक्रम उभारण्यात आल्या आहेत.

गावातील नागरिकांसाठी मार्केटची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावाच्या पूर्व आणि पच्छिम भागात भूखंड आरक्षित आहेत. गावामध्ये पार्किंगची सुविधा नसल्याने भविष्यात पार्किंगची उद्भवणारी समस्या लक्षात घेत नगरसेवक सुरज पाटील आणि सुजाता पाटील यांनी मार्केटबरोबर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती व यासाठी सत्यताने पाठपुरावा देखील केला होता. त्याअनुषंगाने भूखंड क्रमांक पी 14 येथे तांत्रीक कारणास्तव बंद असलेले काम पुन्हा सर्व प्रकीया दुर करुन तळमजल्यावर भाजी आणि मासळी मार्केटसाठी ओटले, पाच वाहनांसाठी वाहनतळ, स्त्री, पुरुष प्रसाधन गृह तसेच पहिल्या मजल्यावर 20 वाहनांसाठी वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकामासाठी 5 कोटी 1 लाख 72 हजार रुपये खर्च होणार आहे. तर भूखंड क्रमांक 16 मधील मार्केटमध्ये तळमजल्यावर फळे, फुले, भाजी मार्केटसाठी 66 ओटले, मासळी मार्केटसाठी 10 ओटले, 2 वाहनतळ, स्त्री, पुरु ष प्रसाधनगृह बांधण्यात येणार असून भविष्यात उद्वाहन बनविण्यासाठी तरतूद केली जाणार आहे तसेच पहिल्या मजल्यावर 22 वाहनांची पार्किग व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 8 कोटी 79 लाख 73 हजार रु पये खर्च करणार आहे. प्रभागातील दोन्ही मार्केट आणि पार्किंग साठी सुमारे 13 कोटी 81 लाख 45 हजार 873 रुपये निधी महापालिका खर्च करणार आहे. मार्केट आणि वाहने पार्किंगसारखी सुविधा उपलब्ध असलेले कुकशेत गाव हे शहरातील पहिलेच गाव ठरणार असून यामुळे गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts