This year's Best Affordable Project and Integrated Township Award was won by Poddar Housing | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

या वर्षाचा सर्वोत्कृष्ट परवडणारा प्रकल्प व इंटिग्रेटेड टाउनशिप पुरस्कार पोद्दार हाऊसिंगने जिंकला

या वर्षाचा सर्वोत्कृष्ट परवडणारा प्रकल्प व इंटिग्रेटेड टाउनशिप पुरस्कार पोद्दार हाऊसिंगने जिंकला

मुंबई(प्रतिनिधी) : पोद्दार हाऊसिंग अँड डेव्हलपमेंट लिमिटेड, जे परवडणाऱ्या गृहनिर्माणात अग्रेसर असून बांधकामात गुणवत्ता लक्षात घेऊन जागतिक दर्जाचे तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविलेले घरे प्रदान करण्यात पुढारी आहेत, यांनी नुकताच पोद्दार समृध्दी एव्हरग्रीन्ससाठी २०१९ सालचा सर्वोत्कृष्ट परवडणारा प्रकल्प तर पोद्दार वंडरसिटीसाठी इंटिग्रेटेड टाऊनशिप ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे सह अध्यक्ष श्री. राजेंद्र मिरगणे यांच्या द्वारे मुंबईतील द अफोर्डेबल हौसिंग समित २०१९ मध्ये प्रदान करण्यात आला.

हिरव्यागार आणि नैसर्गिक शांततेत वसलेले पोद्दार समृद्धी एव्हरग्रीन्स आणि पोद्दार वंडरसिटी मल्टि-फ़ेज प्रकल्प असून ५० एकर क्षेत्रात ते पसरलेले आहे. हे प्रकल्प बदलापूर पूर्वेला स्थित आहेत आणि पद्मभूषण आर्किटेक्ट श्री. हाफिज कॉनट्रॅक्टर यांनी आधुनिक सुविधांच्या भरभराटी सह ते डिझाईन केले आहे, जे परवडणारे लक्झरी पुन्हा परिभाषित करून रहिवाशांना तणावमुक्त जीवन जगण्यास सक्षम करते.

पुरस्कार जिंकल्याबद्दल पोद्दार हाऊसिंग अँड डेव्हलपमेंट लिमिटेडचे मुख्य विक्री व विपणन अधिकारी श्री. सत्यम मरोलिया म्हणाले, “एकूणच आर्थिक मंदी असूनही भारतात परवडणारी गृहनिर्माण क्षेत्र वाढत चालले आहे. परवडणाऱ्या गृहनिर्माणातील अग्रगण्य म्हणून पोद्दार हाऊसिंग वाजवी किंमतीत उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विचार करून खरेदीदारांना त्यांच्या आकांक्षानुसार गृहनिर्माणच्या गरजा भागविण्यात मदत करते. या विजयासह, आम्ही आमच्या आगामी प्रकल्पासाठी समान दृष्टीकोन वापरण्याची अपेक्षा करतो आणि मोठ्या प्रमाणात परवडण्याकरिता एक बेंचमार्क सेट करतो. परवडणाऱ्या गृहनिर्माण खंडासाठी सरकारच्या आधार देणारे धोरणात्मक चौकट आणि नियमांमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल आणि बाजारात सकारात्मक गती येईल.”

बेस्ट अफोर्डेबल प्रोजेक्ट ऑफ द ईयर अवॉर्डबद्दल बोलताना पोद्दार हाऊसिंग अँड डेव्हलपमेंट लिमिटेडचे विपणन उपाध्यक्ष श्री. अमित चंद म्हणाले, “पोद्दार हाउसिंगने नेहमीच योग्य दरात कमीतकमी जागा वाया घालवून उत्तम दर्जेदार घरे देण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकल्पांमागील मुख्य कल्पना म्हणजे रहिवाशांचे आयुष्य सुलभ आणि त्रासमुक्त करण्याच्या सुविधा देऊन त्यांचा राहण्याचा संपूर्ण अनुभव सुलभ करणे होता. आम्हाला अभिमान आहे की या दोन प्रकल्पांबद्दलच्या आमच्या दृष्टिकोनामुळे आम्हाला हे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत आणि आम्ही असे आणखी प्रकल्प तयार करत होम्स फॉर लाईफ उपलब्ध करुन देण्याच्या आमच्या उद्देश्यावर खरे उतरण्याची अपेक्षा करतो.”

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts