The warrior 'Panther' is behind the scenes of time! : Ashok Chavan | Aaplaa Vyaaspith news

Friday, December 13, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

लढवय्या ‘पँथर’ काळाच्या पडद्याआड! : अशोक चव्हाण

लढवय्या ‘पँथर’ काळाच्या पडद्याआड! : अशोक चव्हाण

मुंबई(प्रतिनिधी) : दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते, दलित पँथरचे संस्थापक सदस्य राजा ढाले यांच्या निधनामुळे अन्यायग्रस्तांसाठी संघर्ष करणारा लढवय्या ‘पँथर’काळाच्या पडद्याआड गेल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

ढाले यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, ते एक लढवय्ये नेते होते. आयुष्यभर त्यांनी अन्यायाविरोधात संघर्ष केला. आक्रमक बाणा, परखड विचार आणि विचारधारेवर असलेल्या प्रगाढ विश्वासामुळे ते एक अतिशय लोकप्रिय नेते व लाखो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते.

सामाजिक चळवळीसोबतच साहित्य क्षेत्रातही राजा ढाले यांचे मोठे योगदान होते. ते एक उत्तम साहित्यिक, व्यासंगी अभ्यासक आणि फर्डे वक्ते होते. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीची प्रचंड हानी झाली असून, ते कायम लाखो कार्यकर्त्यांच्या स्मरणात राहतील, या शब्दांत अशोक चव्हाण यांनी राजा ढाले यांना श्रद्धांजली अर्पण केली.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts