The temporary staff of NMMT will be up for resolution in the coming General Assembly | Aaplaa Vyaaspith news

Friday, January 17, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

एनएमएमटीचे अस्थायी कर्मचारी कायम होणार आगामी महासभेत ठराव मांडणार

एनएमएमटीचे अस्थायी कर्मचारी कायम होणार आगामी महासभेत ठराव मांडणार

नवी मुंबई (प्रतिनिधी) : लोकनेते आमदार गणेश नाईक संस्थापित श्रमिक सेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबई परिवहन सेवेतील(एनएमएमटी) कर्मचारी व अधिकार्‍यांना सहाव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम मिळणार असून सातवा वेतन आयोगही लागू होणार आहे. एनएमएमटीमधील रोजंदारी, ठोक , कंत्राटी मानधनावरील कर्मचारी कायम होणार आहेत.
श्रमिक सेनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. संजीव गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक सेनेच्या शिष्टमंडळाने परिवहनचे महाव्यवस्थापक शिरीष आदरवड यांना संघटनेच्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यावर आदरवड यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागण्या मान्य करण्याचे संकेत दिले. या प्रसंगी परिवहनच्या तुभे आगारात झालेल्या कामगारांच्या सभेत डॉ. नाईक यांनी मार्गदर्शन केले. अस्थायी कर्मचारी कायम करण्याचा ठराव पालिकेच्या आगामी महासभेत मांडण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. श्रमिक सेनेचे सरचिटणीस चरण जाधव,श्रमिक सेना परिवहनचे विभागीय अध्यक्ष किशोर पाटील, विभागीय सचिव सतिश बोराटे,सचिव सेंट्रल कमिटी  राजेंद्र पाटील,दिलीप भोईर,दिलीप शिंदे आणि शेकडो कामगार उपस्थित होते.
पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती आणि परिवहन समितीचे पदसिध्द सदस्य नविन गवते यांना देखील मागण्यांचे निवेदन देण्यात आले. परिवहनच्या मागण्यांसंदर्भात आर्थिक तरतूद करण्यासाठी
  परिवहन प्रशासनाला प्रस्ताव सादर करण्याचे सूचित केल्याचे सभापती गवते यांनी सांगितले. डॉ. नाईक यांनी सांगितले की सातवा वेतन आयोग लागू करणे किंवा अस्थायी कर्मचार्‍यांना कायम करणे इत्यादी महत्त्वाच्या मागण्यांबाबत परिवहन समिती आणि पालिकेच्या महासभेत ठराव मंजूर करण्यात येणार असून याविषयी पुढे शासनाकडे श्रमिक सेना तसेच आमदार म्हणून लोकनेते नाईक पाठपुरावा करतील. कामगार हितासाठी पालिकेच्या महासभेत आवश्यक ते सर्व प्रस्ताव मंजूर करण्याच्या सूचना करण्यात आल्याची ग्वाही डॉ.नाईक यांनी याप्रसंगी दिली. पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याशी प्रलंबित मागण्यांवर चर्चा झाली असून या समस्या सोडविण्यास त्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. महापौर जयवंत सुतार यांच्या सहकार्याने या मागण्यांच्या पूर्ततेसाठीचा ठराव महासभेत मांडून तो मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. नाईक यांनी दिली.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts