Breaking News

 नॅचरल डान्स अकॅडेमीचा सहावा वार्षिक समारोह “स्ट्रॉम ” ठरला रंगतदार 

 नॅचरल डान्स अकॅडेमीचा सहावा वार्षिक समारोह “स्ट्रॉम ” ठरला रंगतदार 

नवी मुंबई : दुर्गेश राजपूत संचालीत नॅचरल डान्स अकॅडेमी गेली सहा वर्ष “स्ट्रॉम ” हा वार्षिक समारोह आयोजित करीत आहेत. या वर्षी आंतराष्ट्रीय कीर्तीचे बेले डान्सर प्रदीप विधाते यांनी आपल्या दिलखेच नृत्याने सर्वांची मने जिंकलीत. ही डान्स अकॅडेमी नेहमीच नाविन्याचा ध्यास धरून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न  करतात या मध्ये दुर्गेश राजपूत यांच्या बरोबर शुभदा परजने , दिनेश राजपूत , अरुण वालेकर, मुकेश बाविस्कर , स्वप्नील कदम यांचे योगदान असते. सहाव्या वर्षी हा कार्यक्रम निवेदक दीपक शेट्टी यांच्या निवेदनाने आकर्षक ठरला.  या कार्यक्रमाचे आयोजन आगरी कोळी भवन नेरुळ येथे करण्यात आले यावेळी मोठया संख्येने प्रेक्षक उपस्थित होते . शेकडो विद्यार्थ्यांनी या मध्ये सहभाग घेतला व विविध प्रकारच्या नृत्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळेस नृत्य दिग्दर्शक फिरोज शेख (शॅडोमन) ,  देवेसिंग राजपूत  , फिरोझ शेख , संजीव कुमार व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विजेताना सन्मान चिन्ह  देऊन गौरविण्यात आले .     

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!