दर्पण काव्यसंग्रहाचे प्रकाशन उत्साहात संपन्न

दर्पण काव्यसंग्रहाचे प्रकाशन उत्साहात संपन्न

डोंबिवली : मोहिनीराज प्रकाशनातर्फे कु.विद्या सुरेश नेरकर लिखित ” दर्पण ” काव्यसंग्रह व मोहिनीराजच्या ३० व्या वर्धापण दिन विशेषांकाचा प्रकाशन सोहळा नुकताच डोंबिवली येथील मराठा मंदिर सभाग्रह येथे उत्साहात संपन्न झाला . काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रमुख अतिथी जेष्ठ समिक्षिका सौ. अंजली बापट यांच्या शुभहस्ते व जेष्ठ कवी बाळासाहेब तोरस्कर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. मोहिनीराज वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन त़ोरस्करांच्या हस्ते करण्यात आले.
जीवनाभूती आणि कल्पनाशक्ती यांचा मेळ साधला गेल्यामुळे त्यात एक प्रकारचा ताजेपणा व रसरसितपणा आला आहे. स्वतःच्या आयुषातील अनुभव , उत्कट भावना व निसर्ग सौदर्य यांचा सुरेख मिलाप झाल्यामुळे कु. नेरकर हिचा पहिलाच काव्यसंग्रह लक्षणीय ठरला आहे असे मत सौ. कजली बापट यांनी व्यक्त केले . सौ. स्मिता नेरकर यांनी दर्पण या कवितासंग्रहातील कवितांचा आढावा घेताना सांगितले की मन हे आपला आरसा आहे . मनांंतील विचार जसे असतात तशी पडछाया आरशावर दिसते. मनांतील आत्मप्रतिमा चांगली असल्याने वेडेवाकडे, चुकले ते शब्द काव्यात शब्दरुपात मांंडून कवयित्रीने आपली प्रतिमा बिंबविण्याचा प्रयत्न केला आहे.
आपल्या समारोपाच्या भाषणात जेष्ठ कवी बाळासाहेब तोरस्कर म्हणाले की मोहिनीराज मासिकाची तीन दशके एवढा कालावधी म्हणजे खूपच मोठा आहे. आजच्या स्पर्धेच्या काळातही मोहिनीराजने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे . श्री झेंडे यांचे खूपच कौतुक करायला हवे.त्यांनी आपल्या वयाच्या ७३ व्या वर्षी सुध्दा मोहिनीराजच्या रुपाने सर्वावर मोहिनी टाकली आहे. समाजावर चांगले संस्कार घडविण्यासाठी अशा मासिकाची गरज आहे. जीवनातील ताण तणाव कमी करण्यासाठी लेखन व वाचन हा उत्तम उपाय असल्याचे प्रतिपादन तोरस्कर यांनी केले. मर्मभेदी शब्दांनी सहज शैलीत शैलेश अधिकारी यांनी सूत्रसंचालन केले व एम्. बी. कोल्हे यांनी आभार मानले.
( फोटो कँप्शन :- दर्पण काव्यसंग्रह प्रकाशनप्रसंगी डावीकडून प्रकाशक सुभाष झेंडे , कवी बाळासाहेब तोरस्कर , जेष्ठ समिक्षिका अंजली बापट , कवयित्री विद्या नेरकर , सौ. स्मिता नेरकर व सौ सुरेखा झेंडे)

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!