Sixth State Level Comedy Poetry Meeting of 'Fulora' concludes in Nashik   | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

नाशिक मध्ये ‘फुलोरा’ चे सहावे राज्यस्तरीय हास्य काव्य संमेलन संपन्न

नाशिक मध्ये ‘फुलोरा’ चे सहावे राज्यस्तरीय हास्य काव्य संमेलन संपन्न

नाशिक (प्रतिनिधी) : धावपळीच्या जीवनात कवी मनाने आनंदाचं आकाश मोकळं करण्याच्या उद्देशाने निखळ हास्य पिकवण्यासाठी यंदा कलेचं माहेरघर फुलोराने सहावे राज्यस्तरीय हास्य कवी संमेलन रविवार दि. 3 नोव्हेंबर रोजी हाॅटेल राॅयल हेरिटेज येथे संपन्न केले
या काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मा .डाॅ.श्रदधा लुनीया(साहित्यिक, उद्योजक )व प्रमुख अतिथी मा .श्री ज्ञानेश सोनार (व्यंगचित्रकार)उपस्थित होते. तर मा .चंदनमल बाफना (उद्योजक, अध्यक्ष जैन संघटना, संगमनेर ) मा.श्री. रामअवतार चौधरी, संस्थापक – श्री राम यात्रा. कं. नाशिक यांची उपस्थिती प्रार्थनीय होती.
या काव्यसंमेलनात राज्यातील विविध ठिकाणावरून आलेल्या कवी व कवयित्रीनी एका पेक्षा एक हास्य कविता सादर करून हास्यफुलोरा सुगंधीत केला.
या हास्य काव्यसंमेलनात सहभागी झालेल्या कवी व कवयित्रींचा कोल्हापूरी फेट्याने सन्मान केला. त्याचबरोबर सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. हास्य काव्यसंमेलनाची सुरुवात गणेश स्तवनाने करून व्यंगचित्रकार मा. श्री ज्ञानेश सोनार यांनी काढलेल्या व्यंगचित्राने हास्याचा धबधबा सुरू केला आणि शेकडो कवींच्या उपस्थितीत हास्याच्या खळखळाटाने हे काव्यसंमेलन यशस्वी झाले.
हे काव्यसंमेलन यशस्वी करण्यासाठी कलेचे माहेरघर फुलोरा चे संयोजक सुनिल सातपुते, रज्जाक शेख , रंजना बोरा , सिमा गांधी, गुलाब फुलमाळी , अशोक वरुडे , अनिल चांडक , पुजा दिक्षित , नितीन वाकचौरे, पंचवटी गोंडाळे, सुभाष पांचाळ , दर्शन जोशी आणि आदी मान्यवरांनी अथक परिश्रम घेतले.
उपस्थित सर्व कवी, कवयित्री यांचा यथोचित सन्मान करणारे व्यासपीठ म्हणुन राज्यात कलेचे माहेरघर फुलोराचा नावलौकिक होत असून साहित्यिक क्षेत्राचा मळा फुलवण्यासाठी मोलाची कामगिरी करत आहे.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts