श्री पाणबुडी देवी कलामंच प्रस्तुत कु.संतोष घाणेकर संकल्पित व सहकारीतर्फे संपादक ज्ञानेश्वर मुंडे यांना “वृत्तरत्न”पुरस्कार-२०१९ जाहीर

श्री पाणबुडी देवी कलामंच प्रस्तुत कु.संतोष घाणेकर संकल्पित व सहकारीतर्फे संपादक ज्ञानेश्वर मुंडे यांना “वृत्तरत्न”पुरस्कार-२०१९ जाहीर

शनिवारी मुंबईतील दामोदर नाट्यगृहात पुरस्कार वितरण सोहळा

मुंबई(शांत्ताराम गुडेकर ) : मार्च महिना म्हणजे समस्त कोकणवासियांना आतुरता लागून राहिलेली आहे ती …”शिमगा सण मोठा नाही आनंदाला तोटा” अर्थातच कोकणातील लोकप्रिय उत्सव म्हणजे “शिमगोत्सव” (“होळी”) सण होय.शिमगोत्सव म्हटलं की,कोकणात मुंबईकर चाकरमानी आपल्या गावोगावी वेगवेगळ्या चालीरीती-परंपरा नुसार साजरा होणारा शिमगोत्सव मधील आनंद द्विगुणित करण्यासाठी आवर्जून हजेरी लावतात.शिमगोत्सवात बहुतांशी कोकणातील गावातल्या प्रत्येक वाडीत “नमन” कलेचा सूर चांगलाच गवसलेला असतो.मुंबई रंगभूमीवर यंदाच्या मोसमात “कोकणातील” बऱ्याचशा नमन मंडळानी/नामवंत कलाकारांनी कोकणी साज “बहुरंगी नमन” ही कला सादर करून कलेचे जतन व संवर्धन करण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे.त्यात बदलत्या  काळानुसार “पुरुष प्रधान गवळण आता “स्त्री-पात्रांनी” नटलेली दिसली तरी या कोकणातील लोकप्रिय कलेवर अजुनही रसिक मोठ्या संख्येनं मुंबई रंगमंचावर कार्यक्रम पहायला उपस्थित राहतात.
             कोकणभुमी पुत्र गावी जाण्यापूर्वी दमदार नमन पहाण्याची सुवर्णसंधी देण्यासाठीच  शनिवार दि.१६ मार्च २०१९ रोजी रात्रौ ०८ :३० वा. मुंबईतील प्रसिद्ध अशा दामोदर नाट्यगृह,परल येथे अनेक नामांकित शाहिर/नमन निर्माते यांनी गौरविलेला “चिपळूण तालुक्यातील मौजे मुर्तवडे कातळवाडी गावातील गेली “२५ वर्षे” “कोकणातील “नमन” कलेचं जतन करणाऱ्या “नव जवान बाळ कला मित्र मंडळ ( रजि. )” या मंडळाचा मुंबई रंगमंचावर नावाजलेला नमनाचा कार्यक्रम श्री पाणबुडी देवी कलामंच ( पाचेरी सडा ) ता.गुहागर,जि.रत्नागिरी प्रस्तुत कु.संतोष घाणेकर संकल्पित व सहकारीतर्फे आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्यात पत्रकारिता क्षेत्रात निर्भिडपणे कार्य करणारे साप्ताहीक शहर नामा व आपले शहर न्युज चँनेलचे संपादक ज्ञानेश्वर मुंडे यांना उल्लेखनीय पत्रकारिता व समाजिक योगदानाबद्दल “वृत्तरत्न”पुरस्कार-२०१९ विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.शाळ,पुष्पकरंडक,सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र  असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.दरम्यान श्री पाणबुडी देवी कला मंच युवा शिलेदार यांचाही सत्कार कराण्यात येणार आहे.तरी कोकणभुमिपुत्रांनी व नमन रसिकांनी या नमन प्रयोगाला व पुरस्कार वितरण सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!