She runs from Kashmir to Kanyakumari, giving message of peace. | Aaplaa Vyaaspith news

Monday, October 21, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

शांततेचा संदेश देत ती धावते काश्मीर ते कन्याकुमारी……

शांततेचा संदेश देत ती धावते काश्मीर ते कन्याकुमारी……

मुंबई: काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या भारताच्या विविध प्रांतात एकात्मतेचा शांततेचा संदेश देत ३३ वर्षीय सुफीया खान धावते आहे. लोकांची भेट घेत आहे, त्यांच्याशी चर्चा करीत आहे. राजस्थानमधील अजमेर शहरातील सुफीया खान ही देशातील २२ शहरातून तिची रन फॉर होप मॅरेथॉन दौड करीत आहे. १०० दिवसात तिला ४०३५ किमी अंतर कापायचे आहे. काश्मीरमधून सुरु झालेला तिचा प्रवास आता महाराष्ट्रातून सुरु असून ठाण्यात तिचे आगमन झाले त्यावेळी ठाणेकर नागरीकांनीतिचे स्वागत केले. ठाण्यातील कोरम मॉलमध्ये सुफीयाने भेट देऊन नागरीकांशी व पत्रकारांशी संवाद साधला.

दिल्ली येथे एक विमान कंपनीत ड्युटी ऑफिसर म्हणून त्यांनी १० वर्षे काम केले होते. वयाच्या १६ व्या वर्षी पित्याचे छत्र हरवल्यानंतर मोठ्या जिद्दीने व कष्टाने त्यांनी एअर होस्टेसचे शिक्षण घेतले. मी पूर्वी कोणताही व्यायाम वगैरे असा काही करीत नव्हते. एव्हिएशन क्षेत्रात असल्याने कामाची वेळ सारखी बदलत असायची त्यामुळे व्यायामाला असा वेळ मिळत नव्हता, मग मी वेळ मिळेल तेव्हा धावायला जायची. रनिंगने मला शारीरीक व मानसिक बळ दिले. मी नंतर अनेक स्पर्धातूनही भाग घेऊ लागली असे सुफीया खान यांनी सांगितले.

सुफीया खान यांनी दिल्ली-जयपूर-आग्रा-दिल्ली ही ७२० किमीची ग्रेट इंडियन गोल्डन ट्रँगल ही स्पर्धा १६ दिवसात पूर्ण केली. ही स्पर्धा सर्वात जास्त कमी वेळात पूर्ण करणारी पहिली महिला म्हणून त्यांना गौरविण्यात आले. इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये देखील या विक्रमाची नोंद घेण्यात आली आहे. त्यानंतर मात्र नोकरीपेक्षा रनिंगवरच ध्यान देण्याचा निर्धार त्यांनी केला आणि नोकरी सोडली.

भारतात विविध धर्माचे, पंथाचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. देशाच्या विकासासाठी सगळ्यांनी जात धर्म बाजूला ठेवून पुढे यायला हवे, देशात शांतता हवी. तरच विकास होऊ शकेल हा संदेश भारतीयांपर्यंत पोहचावा यासाठी त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा मी निर्णय घेतला आणि काश्मीर ते कन्याकुमारी ही भारताची दोन्ही टोक धावून पूर्ण करण्याच्या मोहिमेला लागले, असे सुफीया खान पुढे म्हणाल्या. लोकांचा चांगला प्रतिसाद शहरातून, गावातून मिळत आहे. महाराष्ट्रातून पुढे दक्षिण भारताकडे आपण वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसाला साधारणतः ५० किमीचे अंतर आपण पार पाडतो असे त्यांनी सांगितले. २१ एप्रिल २०१९ ला श्रीनगर-काश्मीर येथून त्यांनी रन फॉर होपला सुरुवात केली होती. 

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts