Separate a wedding ceremony | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

एक आगळा वेगळा विवाह सोहळा

एक आगळा वेगळा विवाह सोहळा

अहमदनगर प्रतिनिधी( राहुल कोळसे): नाशिक जिल्ह्य़ातील सटाणा येथे 16 जुन रोजी एक आदर्श विवाह सोहळा होत आहे. कळवण तालुक्यातील पवार तसेच सटाणा येथील ठाकरे कुटुंबियांच्या वतीने लग्नसमारंभ निमित्त एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे.महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवशाहीर डाॅ.विजय महाराज तनपुरे यांच्या पोवाड्यांनी प्रेरित होऊन, त्यांचे शिवचरित्र पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या विवाहाचे औचित्य साधून नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर तालुक्यातील मेंढी येथे अंध, अपंग, अनाथ वृद्ध यांच्या साठी होत असलेल्या शिवाश्रम साठी व त्र्यंबकेश्वर येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांसाठी या दांपत्याने लग्नात होणारा खर्च हा देणगी म्हणून देण्यात येणार आहे.या लग्नाची आठवण म्हणून डॉ.तनपुरे महाराजांच्या शिवाश्रम मधील एक अपंग मुलगी दत्तक घेऊन तिचे शिक्षण व लग्नापर्यंत सर्व जबाबदारी पवार कुटुंबाच्या वतीने घेण्यात आली आहे.तसेच वृक्षारोपण वाटप कार्यक्रम, रक्तदान शिबीर असे विविध सामाजिक कार्यक्रमाचे केले आहे.विशेष म्हणजे वधू वर हे दोघेही उच्चशिक्षित आहेत.कळवण तालुक्यातील मोकभणगी येथील चि. संदीप लक्ष्मण पवार हे परदेशात नोकरी करत आहेत तर सटाणा तालुक्यातील पिंपळकोठे येथील वधू चि.सौ.का. सुवर्णा बापु ठाकरे हिने एम.एस.सी. चे शिक्षण पुर्ण केले आहे.या विवाह सोहळ्यासाठी अपंगांचे कैवारी आ.बच्चु भाऊ कडू हेही उपस्थित राहणार असल्याचे वर्तविले जात आहे.अशा या 16 जुन रोजी सुर्या लॉन्स, ताहाराबाद रोड, सटाणा येथे होत असलेल्या या उच्चशिक्षित जोडप्याच्या विवाह सोहळ्याची संपूर्ण नाशिक जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts