sathe colleges are "saptrang" | Aaplaa Vyaaspith news

Friday, January 17, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

साठये महाविद्यालयात “सप्तरंग”

साठये महाविद्यालयात “सप्तरंग”

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साठये महाविद्यालय मराठी वाङमय मंडळाच्या मराठी भाषासंवर्धन पंधरवड्यातील कार्यक्रमांअंतर्गत आयोजित करण्यात आलेला ‘सप्तरंग २०१९-२०’ हा तीन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामहोत्सव दि. ११ जानेवारी, २०२० रोजी संपन्न झाला. ‘सप्तरंग’ या नावाप्रमाणेच या स्पर्धामहोत्सवात वक्तृत्व, वादविवाद, स्वरचित काव्यवाचन, निबंध, प्रश्नमंजुषा, स्टँड-अप कॉमेडी, खो-खो या सात स्पर्धांचा समावेश होता. हे ‘सप्तरंग’ महोत्सवाचे सहावे वर्ष होते. विविध ४५ महाविद्यालयांमधून १९१ विद्यार्थ्यांनी या महोत्सवात स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता.

दि. ९ जानेवारीला महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात प्राचार्यांच्या हस्ते या स्पर्धामहोत्सवाचे उदघाटन झाले. वक्तृत्व स्पर्धेच्या सुरुवातीला मराठी अभिनेते आनंदा कारेकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. दुसऱ्या दिवशी झालेले चुरशीचे खो-खो सामने लक्षवेधी ठरले. बक्षीस वितरण समारंभास सुप्रसिद्ध मराठी अभिनेता सुयश टिळक, ‘विनय आपटे प्रतिष्ठान’च्या वैजयंती आपटे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धांना लेखक अभिनेते दिग्दर्शक जयेश मेस्त्री, सुप्रसिद्ध अभिनेते विनायक पंडित, पत्रकार-संपादक अनुज केसरकर, साहित्यिका डॉ. पल्लवी बनसोडे, अभिनेत्री-निवेदिका पुजा काळे आणि गुरुदत्त वाकदेकर मान्यवर परीक्षक म्हणून लाभले.

उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा मानाचा फिरता सप्तरंग महाकरंडक माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयाने पटकावला. दरवर्षी प्रमाणे ‘विनय आपटे प्रतिष्ठान’ सप्तरंग स्पर्धामहोत्सवाचे प्रायोजक होते. सोबतच ‘भारतीय जीवन बीमा निगम’ व दै. लोकमत हे देखील प्रायोजक होते.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts