Presentation of new residential complexes in Mumbai increased 22% in first half of 2019: Knight Frank report | Aaplaa Vyaaspith news

Tuesday, October 22, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

मुंबईत नव्या निवासी संकुलांच्या सादरीकरणात २०१९च्या पहिल्या सहामाहीत २२ टक्क्यांची वाढ :नाइट फ्रँक अहवाल

मुंबईत नव्या निवासी संकुलांच्या सादरीकरणात २०१९च्या पहिल्या सहामाहीत २२ टक्क्यांची वाढ :नाइट फ्रँक अहवाल

मुंबई, ९ जुलै २०१९: नाइट फ्रँक इंडियाने आज इंडिया रिअल इस्टेट हा त्यांचा मुख्य सहामाही अहवाल सादर केला. या अहवालात जानेवारी ते जून २०१९ (२०१९ची पहिली सहामाही)या काळात आठ शहरांमधील निवासी आणि व्यावसायिक बाजारपेठेच्या कामगिरीचा सर्वसमावेशक आढावा घेण्यात आला आहे. या अहवालातील आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की,मुंबईत या सहामाहीत निवासी प्रकल्पांच्या सादरीकरणात २२ टक्क्यांची वाढ होऊन हा आकडा ४३,८२२ वर पोहोचला आहे. २०१८ च्या पहिला सहामाहीत हा आकडा ३५,८७४ इतका होता. विकल्या गेलेल्या घरांच्या संख्येत २०१८ च्या पहिल्या सहामाहीतील ३२४१२ या संख्येत ४ टक्क्यांची वाढ होऊन हा आकडा २०१९ मध्ये ३३,७३१ वर पोहोचला आहे.

मुंबईतील कार्यालयीन जागेच्या संदर्भात, व्यवहार झालेल्या कार्यालयीन जागेत २०१९च्या पहिल्या सहामाहीत ६१ टक्क्यांची वाढ होऊन हा आकडा ०.४३ दशलक्ष चौरस मी. (४.६ दशलक्ष चौ. फूट) वर पोहोचला आहे. २०१८ च्या पहिल्या सहामाहीत हा आकडा ०.२७ दशलक्ष चौ. मी (२.९ दशलक्ष चौ. फूट) होता. इतर सेवा क्षेत्रांमध्ये म्हणजेच मीडिया, कन्स्लटिंग, ई-कॉमर्स, को-वर्किंग या क्षेत्रांनी रीअल इस्टेटच्या व्यवहारांमध्ये सातत्याने मोठा वाटा पटकावत २०१९ मध्ये ३९ टक्के सहभाग आणि ३४ टक्के बीएफएसआय नोंदवला.

——————————————————————————————————–

·         २०१८मध्ये या बाजारपेठेत २२० टक्के (मागील वर्षाच्या तुलनेत)अशी दणदणीत वाढ झाली होती. मात्र, २०१९च्या पहिल्या सहामाहीत ही वाढ २२ टक्क्यांवर (मागील वर्षाच्या तुलनेत) आली.

·         २०१९च्या पहिल्या सहामाहीतील नव्या सादरीकरणातील ६२ टक्के घरांच्या किमती ७.५ दशलक्ष पेक्षा कमी तर ८२ टक्के घरे १० दशलक्षांच्या आतली.

·         ठाण्यातील बाजारपेठेत देशातील काही सर्वात मोठ्या कॉर्पोरेट्सकडून नवी सादरीकरणे सुरू करण्यात आली. या काळात ठाण्यात सर्वाधिक नवे प्रकल्प आले.

·         २०१९च्या पहिल्या सहामाहीत एमएमआरमध्ये ४ टक्के वाढ होऊन हा आकडा ३३,३७१ वर पोहोचला.

·         २०१९च्या पहिल्या सहामाहीत विक्रीवर दोन घटकांचा मोठा परिणाम झाला – जीएसटीमधील गोंधळ आणि निवडणुकांमुळे आलेली अनिश्चितता

·         आरबीआयने व्याजदर कमी केल्याचा फायदा ग्राहकांना अजून मिळायचा आहे, २०१९ मध्ये आरबीआयच्या ७५ बीपीएस कमी करण्याच्या तुलनेत बँकांनी फक्त १० ते ३० बीपीएस कमी केला आहे

·         जीएसटीमधील बदलांमुळे ग्राहकांमध्ये अपेक्षित उत्साह दिसला नाही, अनेक विकासकांनी सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी आयटीसीसह १२ टक्के हा आधीचाच जीएसटी नियम अंगिकारण्याला प्राधान्य दिले आहे.

·         मध्य मुंबईच्या आसपास एमएमआरमध्ये २०१९च्या पहिल्या सहामाहीत सर्वाधिक म्हणजे ९ टक्के वाढ झाली आहे. त्या खालोखाल ठाण्यात ७ टक्के (मागील वर्षाच्या तुलनेत)वाढ झाली.

·         एमएमआरमधील तुलनेने स्वस्त बाजारपेठांमध्ये म्हणजेच ठाणे, पेरीफेरल सेंट्रल सबर्ब आणि पेरीफेरल वेस्टर्न सबर्ब या भागात २०१९च्या पहिल्या सहामाहीतसुद्धा परवडणाऱ्या घरांमुळेच विक्रीला चालना मिळाली आणि ही बाजारपेठ भागात २०१९च्या पहिल्या सहामाहीत ६ टक्के (मागील वर्षाच्या तुलनेत) वाढली. तर याच काळात मुख्य बीएमसी भागातील बाजारपेठ फक्त ३ टक्क्यांनी वाढली.

·         प्रकल्पांच्या विक्रीच्या तुलनेत बांधकाम बरेच असल्याने २०१९ च्या पहिल्या सहामाहीत एमएमआर भागात न विकल्या गेलेल्या घरांचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत १४ टक्के टक्के १३६,५२५ इतके होते.

·         एमएमआर बाजारपेठेत क्वार्टर्स-टू सेल (क्यूटीएस) २०१८ च्या पहिल्या सहामाहीतील ८ क्वॉर्टर्सवरून २०१९च्या पहिल्या सहामाहीत ८.५ वर गेले. मात्र, सध्याचा ८.५ क्वार्टर्स हा आकडा म्हणजे उत्तम बाजारपेठेच लक्षण मानू नये. मागील काही वर्षात म्हणजेच २०१४ ची दुसरी सहामाही ते २०१७ ची पहिली सहामाही या काळात कायमच बांधकामांची संख्या विक्रीपेक्षा अधिक होती.

·         २०१८च्या दुसऱ्या सहामाहीत एनबीएफसी क्षेत्रातील खेळत्या भांडवलाच्या समस्येमुळे आजही एमएमआर बाजारपेठेवर मळभ आहे आणि विकासकांसाठी निधीचे मुल्य १८० ते २५० बीपीएस असे चढेच राहिले आहे.

·         एमएमआर बाजारपेठेतील वेटेड अॅव्हरेज प्राइज २०१९ च्या पहिल्या सहामाहीत मागील वर्षीच्या तुलनेत ३ टक्के कमी होती. २०१६ च्या दुसऱ्या सहामाहीपासून १२ टक्क्यांवरून हे प्रमाण कमी कमी होत आले आहे.

·         अनेक अप्रत्यक्ष सवलती आणि मोफत बक्षिसे बाजारपेठेत ग्राहकांविना पडून आहेत, यात नो फ्लोअर राइज, नो स्टॅम्प ड्युटी, २ वर्ष मेंटनन्समुक्त काळ, क्लब हाऊसचे पैसे भरावे न लागणे, २ वर्षांसाठी खात्रीची भाडे योजना, अनेक सबवेंशन योजना, डीफर्ड पेमेंट प्लॅन्स अशा सवलतींचा समावेश आहे.

·         सबवेंशन योजना आणि डीफर्ड पेमेंट प्लन्स याआधी फक्त बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी होत्या. आता या सवलती काही ओसी रेडी प्रकल्पांमध्येही दिल्या जात आहेत.

·         मुंबईतील बांधकाम क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक. २ ट्रिलियन किंवा २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार. १.१६ ट्रिलियन किंवा १.१६ लाख कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे.

रीटेल अॅण्ड हॉस्पिटॅलिटीच्या व्हॅल्युएशन अॅण्ड अॅडव्हायझरीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर गुलाम झिया म्हणाले, “मुंबईतील निवासी रिअल्टी बाजारपेठेचे स्वरूप असेच काहीसे उदास आणि मळभ असलेलेच असणार आहे. एनबीएफसीमुळे अनेक गोष्टी मृत होत जातील आणि भारतीय गृह बाजारपेठेवरील ही काळी छाया अधिक गडद होत जाईल. अर्थसंकल्पात देण्यात आलेल्या सवलतीही या क्षेत्राला सध्याच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आणि कडेलोटाच्या टोकावर उभ्या असलेल्या आणखी काही विकासकांना वाचवण्यासाठी पुरेशा नाहीत. मात्र, परवडणाऱ्या दरातील घरे ही संकल्पना या काळयाकुट्ट आकाशातील एक रुपेरी किनार आहे. ‘सर्वांसाठी घरे’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी या क्षेत्रासाठी आणखी काही सवलती जाहीर केल्या आहेत. या कठीण परिस्थितीनंतरही ज्या विकासकांना बाजारपेठेत टिकून रहायचे आहे त्यांनी आपल्या व्यवसायांच्या पद्धती बदलायला हव्यात आणि परवडणाऱ्या दरातील अधिक घरे बनवण्यावर भर द्यायला हवा.”

———————————————————————————————————–

·         मुंबई मेट्रोपोलिटन रीजन (एमएमआर) क्षेत्रातील व्यवहार मागील वर्षीच्या तुलनेत ६१ टक्के अशा दमदार वाढीसह ०.४३ दशलक्ष चौ. मी. (४.६ दशलक्ष चौ. फूट) इतके वाढले.

·         २०१९ च्या पहिल्या सहामाहीत काही मोठे व्यवहारही पार पडले. यात बँकिंग, फायनान्शिअल सर्विसेस अॅण्ड इन्शुरन्स (बीएफएसआय) क्षेत्र, इतर सेवा क्षेत्र आणि को-वर्किंगमधील व्यवहारांचा समावेश आहे.

·         २०१९ च्या पहिल्या सहामाहीत नवे प्रकल्प पूर्ण होण्याचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत ५६ टक्क्यांनी घटून ०.१८ दशलक्ष चौ. मी. (१.९ दशलक्ष चौ. फूट)वर आले.

·         सहा पैकी फक्त तीन बिझनेस डिस्ट्रिक्ट्समध्ये २०१९ च्या पहिल्या सहामाहीत पुरवठ्यात वाढ झाली. यात पेरीफेरल बिझनेस डिस्ट्रिक्ट (पीबीडी), सबर्बन बिझनेस डिस्ट्रिक्ट(एसबीडी) सेंट्रल आणि एसबीडी वेस्टचा समावेश आहे.

·         एसबीडी सेंट्रल बाजारपेठेत मागणी वाढत आहे. २०१९च्या पहिल्या सहामाहीत येथील व्यवहारांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत १४३ टक्क्यांची वाढ झाली.

·         २०१९ च्या पहिल्या सहामाहीत पीबीडीमध्ये सर्वाधिक म्हणजेच ३१ टक्के व्यवहार झाले. एसबीडी वेस्ट आणि एसबीडी सेंट्रलमध्ये २०१९ च्या पहिल्या सहामाहीत एकत्रितरित्या ५० टक्के व्यवहार पार पडले.

·         इतर सेवा क्षेत्रांमध्ये म्हणजेच मीडिया, कन्स्लटिंग, ई-कॉमर्स, को-वर्किंग या क्षेत्रांनी रीअल इस्टेटच्या व्यवहारांमध्ये सातत्याने मोठा वाटा पटकावत २०१९ मध्ये ३९ टक्के सहभाग आणि ३४ टक्के बीएफएसआय नोंदवला.

·         को-वर्किंग ऑपरेटर्सनी २०१९ च्या पहिल्या सहामाहीत ०.०२ दशलक्ष चौ. मी किंवा ०.३ दशलक्ष चौ. फूट कार्यालयीन जागा घेतली आणि इतर सेवा क्षेत्रांमध्ये २०१९ च्या पहिल्या सहामाहीत १४ टक्के वाटा नोंदवला

·         २०१९ च्या पहिल्या सहामाहीत उपलब्धतेचे प्रमाण २०१८च्या पहिल्या सहामाहीच्या २१.५ टक्क्यांच्या तुलनेत जवळपास ४०० बीपीएसने कमी होऊन १७.८ टक्क्यांवर आले.२०१८ ची दुसरी सहामाही आणि २०१९ ची पहिली सहामाही या काळात व्यवहारांच्या तुलनेत पुरवठा कमी होता.

·         एमएमआर ऑफिस बाजारपेठेतील वेटेड अॅव्हरेज ट्रान्झॅक्टेड रेंटल्स २०१९ च्या पहिल्या सहामाहीत मागील वर्षीच्या तुलनेत ७.८ टक्क्यांनी वाढले. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स(बीकेसी) आणि ऑफ-बीकेसी या महागड्या बिझनेस डिस्ट्रिक्टमधील व्यवहार २०१८ च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत अधिक झाले.

·         सेंट्रल मुंबई भागात भाड्याच्या व्यवहारांमध्ये २०१९ च्या पहिल्या सहामाहीत मागील वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांची वाढ झाली, त्या खालोखाल बीकेसीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ५ टक्के आणि एसबीडी सेंट्रलमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ५ टक्क्यांची वाढ झाली.

·         वापरकर्त्यांनी जागेचे एकत्रीकरण करण्याचा ट्रेंड एमएमआर कार्यालयीन बाजारपेठेत कायम आहे. याच काळात व्यवहारांची संख्या १०५ वरून १६० वर पोहोचली असली तर व्यवहारांचा सरासरी आकार प्रत्येक व्यवहार २५४८ चौ. मी (२७४२९ चौ. फूट) वरून २७०० चौ. मी. (२९०५९ चौ. फूट) असा वाढला आहे.

रीटेल अॅण्ड हॉस्पिटॅलिटीच्या व्हॅल्युएशन अॅण्ड अॅडव्हायझरीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर गुलाम झिया म्हणाले, “भारतभरात ऑफिस बाजारपेठेत स्थिर गतीने वाढते आहे. प्रत्येक वर्षी आधीच्या तुलनेत अधिक व्यवहार होत आहेत. मुंबईने सहामाहीत या व्यवहारांमध्ये वाढ अनुभवली आहे. बीएफएसआय आणि इतर सेवा क्षेत्रांनी या जागा वापरण्यास घेतल्याने ही वाढ झाली. शहरातील उपलब्ध जागांचे प्रमाण वाढले असले तरीही प्राधान्यक्रमाच्या बाजारपेठांमध्येही आजही उपलब्धता कमी आहे. एसबीडी सेंट्रल भागात गेल्या काही वर्षांपासून जागा हवी असणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे आणि लवकरच बीकेसी व सेंट्रल मुंबईप्रमाणे ही बाजारपेठही अधिक पुरवठ्याच्या बाजारपेठांमध्ये समाविष्ट होईल.”

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts