Pāṇī kapātīcyā niṣēdhārtha manasēcē mahāpālikā pravēśavdārāvara haṇḍāphōḍa āndōlana | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

पाणी कपातीच्या निषेधार्थ मनसेचे महापालिका प्रवेशव्दारावर हंडाफोड आंदोलन

पाणी कपातीच्या निषेधार्थ मनसेचे महापालिका प्रवेशव्दारावर हंडाफोड आंदोलन

पुणे(प्रतिनिधी) : मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात मनसेच्या कार्यकर्त्यांनी निष्क्रिय महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. शहरातील नागरिकांवर पाणीकपात लादल्याने प्रशासनाचा आणि सत्ताधारी भाजपचा निषेध करण्यात आला.

यावेळी मनसे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले, सचिव रुपेश पटेकर, विद्यार्थी अध्यक्ष हेमंत डांगे, राजू सावळे, चंद्रकांता दानवले, सुरेश सकट, मयूर चिंचवडे, दत्ता देवतरासे, सचिन मिटपगार, नितीन चव्हाण, प्रतीक शिंदे, अक्षय काळे, मयूर कांबळे, विकास कदम, अजय आढागळे, नारायण पठारे, तेजस दाते, अश्विनी बांग, सीमा बेलापुरकर, सुजाता काटे, अनिता पांचाळ, संगीता देशमुख, स्नेहल बांगर, श्रद्धा देशमुख, वैशाली बोराटे, सुरेश शिंदे, दीपक नाईक, नितीन कांबळे, अदिकराव पोळ, स्वप्नील महांगरे, रोहित काळभोर आदींसह मनसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts