P.l. Deshpande Maharashtra Arts Academy, a platform for rights for beginners | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी तर्फे नवोदितांसाठी हक्काचे व्यासपीठ

पु ल देशपांडे महाराष्ट्र  कला अकादमी तर्फे  नवोदितांसाठी हक्काचे व्यासपीठ

मुंबई(प्रतिनिधी) : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि ऑगस्ट मीडिया आणि ट्रैनिंग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या निवेदन कार्यशाळेमधील यशस्वी विद्याथ्यांचे सादरीकरण “सृजन “विविध कलागुणांनी संपन्न असा कलाविष्कार ‘पु ल कट्टा’ या उपक्रमामध्ये सादर करण्यात आला. हा उपक्रम म्हणजे, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी तर्फे नवोदितांसाठी हक्काचे व्यासपीठ आहे. सदर कार्यक्रमात विविध स्तरातील आणि विविध भागातील लेखक ,कवी,गझलकार ,नाटककार यांनी यांच्या कलाकृतींचा नजराणा पेश करताना उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले . सदर कार्यक्रमाची सुरवात पु ल देशपांडे कला अकादमी यांचे प्रकल्प संचालक विभीषण चवरे ,ऑगस्ट मीडियाच्या सर्वेसर्वा डॉ. मृण्मयी भजक ,सुप्रसिद्ध गायिका पुष्पा पागधरे ,ग्लोरिया डिसुझा यांनी दीप प्रज्वलाने केले .उपस्थित निवेदन कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थींची हि कमी कालावधीतील झेप स्तुत्य असल्याचे मत विभूषण चवरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले .सादरकर्त्या सदर कार्यक्रमास राकेश तळगावकर यांचे पु ल देशपांडे कला अकादमीतर्फे नियोजक म्हणून काम बघितले,तर नियोजनाची जवाबदारी वैभव धनावडे ,श्वेता ठाकूर आणि प्रीतम पाथरे यांनी डॉ. मृण्मयी भजक यांच्या मार्गदर्शना खाली पार पाडली .

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts