Organizing a great job fair at SNDT to Churchgate | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चर्चगेटला एसएनडीटीत महारोजगार मेळाव्याचे आयोजन

चर्चगेटला एसएनडीटीत महारोजगार मेळाव्याचे आयोजन

मुंबई (रुपेश दळवी) – एस.एन.डी.टी.कला आणि एस.सी.बी.वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय चर्चगेट, मुंबई यांच्या प्रशिक्षण व रोजगार विभाग आणि टेक्णोसर्व यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ फेब्रुवारी २०२० रोजी महाविद्यालयात महारोजगार भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे.
या रोजगार मेळाव्यात मुंबई आणि महाराष्ट्रातील एक्सिस बँक, एचडीएफसी लाईफ इन्सुरन्स, मोतीलाल ओसवाल, आयसीआयसीआय प्रूडेन्सिअल, साम्को सेक्युरेटीज, रेलींस ब्रांड-हम्लेंस, एचडीबी फिनान्स, आय-टेक, टेलपरफॉरमन्स, सायनेक्स, सीतल समूह, रिलायन्स निप्पोन या विविध क्षेत्रातील नामांकित १२ उद्योजक त्याच्या कंपन्यांमध्ये रिक्त असलेल्या विविध पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहून योग्य उमेदवारांची निवड करणार आहेत. या महा रोजगार मेळाव्यात ७००हून अधिक उमेदवारांनी त्यांची नावे नोंदविली आहेत.
या रोजगार मेळाव्यासाठी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ राजेंद्र गुरव, प्रशिक्षण व रोजगार विभाग अधिकारी-डॉ किशोर कदम, प्रा.राहुल शिंदे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षेकेत्तर कर्मचारी, स्वयंसेविका विद्यार्थिनी आणि टेक्णोसर्वचे पदाधिकारी उपस्थित असणार आहे. नामांकित कंपन्यात चांगली संधी असल्याने पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवीप्राप्त विविध शाखेतील विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : प्रा. निलेश हुमे सर : 9867252009

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts