आमदार निधीतून 7 ओपन जिमचे लोकार्पण

आमदार निधीतून 7 ओपन जिमचे लोकार्पण

नवी मुंबई (प्रतिनिधी): “ आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा” हे ब्रीदवाक्य जपत नवी मुंबईतील नागरिकांनी आरोग्यासाठी थोडा वेळ व्यायामासाठी द्यावा,यासाठी बेलापूर विधानसभेच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून बेलापूर मतदारसंघ क्षेत्रात एकूण 22 ठिकाणी ओपन जिमउभारण्यात आले. त्यापैकी 7 ओपन जिमचे उदघाटन नुकतेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ महिलांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी नगरसेवक दीपक पवार, जयवंत तांडेल, पुण्यनाथ तांडेल, लक्ष्मण मार्के, प्रभाकर कांबळे, प्रशांत तांडेल, अलका दीक्षित, शर्मिला संकर,समीर शहा, संजय ओबेरॉय उपस्थित होते.  सीबीडी सेक्टर – 9 येथील रॉक गार्डन, सीबीडी सेक्टर–15 गणा शिमग्या पाटील उद्यान, सेक्टर– 58एन.आर.आय कॉम्लेक्स उद्यान, गणपतशेठ तांडेल मैदान, करावे गाव तलाव, केंद्रीय विहार गणेश मंदिर से-38 व साईवाडी से-36 करावे गाव अशा 7 ओपन जिमचे लोकार्पण करण्यात आले.

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, रोजच्या कुटुंबाच्या धावपळीत अनेक महिला तसेच ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या आरोग्याकडेदुर्लक्ष करतात. त्यामुळे महिलांचे आरोग्य अधिक बिघडत चालले आहे. त्यात प्राणायाम, व्यायाम करण्याची इच्छा असतानाही घरापासून या सुविधालांब असल्याने महिलांचे व ज्येष्ठ नागरिकांचे जाणे होत नाही. त्यामुळे घराच्या परिसरातच उद्यानामध्ये खुल्या व्यायामशाळांची (ओपन जिम) चीतेथील स्थानिक नागरिकांची मागणी होती. याच अनुषंगाने  व्यायाम साहित्य उपलब्ध केल्यास त्याचा उपयोग करता येईल या विचारातून बेलापूरविधानसभा क्षेत्रात एकूण 22 ठिकाणी आमदार निधीचा वापर करत ओपन जिमची निर्मिती केली. यापैकी 7 ओपन जिमचे लोकार्पण करण्यातआले आहे. व्यायामाचे अत्याधुनिक साहित्य बसविण्यात आले असून त्यामध्ये सायकलिंग, एअर वाकॅर्स, रोईंग, चेस्ट प्रेस आदी साहित्यांचा समावेशआहे. 

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!