nerul Councilor visits municipal commissioner for civic work in the ward | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

प्रभागातील नागरी कामासाठी नेरूळच्या नगरसेविकांंनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

प्रभागातील नागरी कामासाठी नेरूळच्या नगरसेविकांंनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

नवी मुंबई (प्रतिनिधी ) : आज नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक सुरज बाळाराम पाटील, प्रभाग ८५ च्या नगरसेविका सुजाता सुरज पाटील तसेच प्रभाग क्र.८६ च्या नगरसेविका जयश्री एकनाथ ठाकुर यांनी प्रभागातील नागरी कामांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेतली असून सदर भेटीदरम्यान दोनही प्रभागातील नागरी कामांसबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती या नात्याने सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका कार्यक्षेत्रातील गरजवंत विद्यार्थ्यांना मागील वर्षाची तसेच चालू वर्षी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती मध्ये दिरंगाई होत असलेबाबत नाराजी व्यक्त करुन सदर शिष्यवृत्तीचा लाभ लवकरात लवकर देण्यासाठी आयुक्तांना विनंती केलेली आहे.
नगरसेवक सुरज पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सुजाता सुरज पाटील तसेच नगरसेविका जयश्री ठाकुर यांनी प्रभागातील मंजूर केलेले वॉर्ड ऑफिस/मार्केट टेंडर नोटीस काढणे, पामबीच सर्व्हिस रोड शेजारी सुशोभिकरण प्रस्ताव मंजूर करणे, कुकशेत येथील आरोग्य केंद्रामध्ये सुविधा उपलब्ध करणे, स्मशानभूमी उभारणे, कुकेशत गांव मैदान सुधारणा करणे, फिटनेस सेंटर प्रस्ताव मंजुरीस पाठविणे, भुखंड क्र.OS-3 येथील उद्यान उभारणे, प्रवेशद्वार उभारणे, (बामनदेव) होल्डींग पाँड जवळील रस्ता बनविणे, आगरी कोळी संस्कृतीदर्शक शिल्प उभारण्याचे काम मार्गी लावणे, जेट्टीवर सुविधा उपलब्ध करणे, आरोग्याच्या दृष्टिकोनातून विशेष फवारणी मोहिम राबविणे, प्रभागात स्वच्छता राखणे करीता संबंधितांना सुचना करणे व इतरत्र कामे यासंबधी आयुक्तांशी चर्चा करुन सदरची कामे लवकरात लवकर पुर्णत्वास नेण्याची मागणी आयुक्तांकडे केलेली आहे.
यावेळी सदरची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन देखील आयुक्तांनी दिले.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts