Navratri festival celebrated at Shri Govardhani Mata Temple | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

श्री गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न

श्री गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

नवी मुंबई :- नवी मुंबईतील दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीचे पुरातन पेशवेकालीन एकमेव मंदिर म्हणजे श्री गोवर्धनी मातेचे मंदिर अशी अख्यायिका आहे. श्री गोवर्धनी मातेची प्राणप्रतिष्ठापना पेशवेकाळात झाली असून नवी मुंबईतील नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशातील ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना नवसाला पावणारी आई म्हणून श्री गोवर्धनी माता प्रसिद्ध आहे. नवी मुंबईतील सोनार, ब्राम्हण, आगरी कोळ्यांची कुलदेवता असलेली भक्तांच्या हाकेला धावणारी व सर्व मनोकामना पूर्ण करणारी अशी श्री गोवर्धनी मातेची जनमाणसात ख्याती आहे.श्री गोवर्धनी मातेचे मंदिर हे निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या निसर्गरम्य टेकडीवर वसलेले मंदिराच्या जवळच शिवकालीन किल्ले असून संपूर्ण परिसर हिरवळीने नटलेले आहे. मादिराच्या पाठीमागे विस्तीर्ण असा समुद्र लाभलेला आहे. अशा या पुरातन पेशवेकालीन मंदिराचा जीर्णोद्धार बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी गेल्या 12 वर्षापूर्वी केला असून सुंदर भव्य असे मंदिर दक्षिणात्य पद्धतीने उभारले आहे. श्री गोवर्धनी माता म्हणजे साक्षात जणूकाय महालक्ष्मी, तुळजाभवानी, दुर्गामाता, एकविरा आईचे बालरूप आहे.
किल्ले गावठाण बेलापूर येथील पुरातन अशा पेशवेकालीन श्री गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन “बेलापूरच्या आमदार सौ. मंदा मंदाताई म्हात्रे यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे. श्री गोवर्धनी माता मंदिरात 06 ऑक्टोबर 2019 रोजी हळदी-कुंकू समारंभ तसेच पारंपारिक वेशभूषा सांकृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात महिलांचा भजन कीर्तन, नाचगाणी, संगीतनृत्य, मंगलागौरी, नृत्य अशा अनेक कार्यक्रमात शेकडो महिलांनी उत्साहात भाग घेतला. यावेळी किल्ले गावठाण ग्रामस्थ महिला मंडळ, बेलापूर ग्रामस्थ महिला मंडळ, श्री गोवर्धनी सामाजिक सेवा महिला मंडळाच्या महिला सदस्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. पारंपारिक वेशभूषा करून आलेल्या महिलांना आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
तसेच आज श्री गोवर्धनी माता मंदिरात नवचंडी होमचा कार्यक्रम अतिउत्साहात साजरा झाला असून महाप्रसादाचाही शेकडो नागरिकांनी लाभ घेऊन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सर्व पक्षीय नेते तसेच कार्यकर्ते यांनी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे भेट घेऊन पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts