Navi Mumbai MNS will allocate 1000 kg of onion at Sanpada at affordable rates | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

नवी मुंबई मनसे करणार स्वस्त दरात सानपाडा येथे १००० किलो कांदा वाटप

नवी मुंबई मनसे करणार स्वस्त दरात सानपाडा येथे १००० किलो कांदा वाटप

नवी मुंबई (प्रतिनिधी) : अवकाळी पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या किंमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे. २० – ३० रुपये किलोने विकला जाणारा कांदा थेट १०० ते १५० रुपये किलोवर पोहोचल्याने सामान्यांचे बजेट पुरते कोलमडले आहे. त्यामुळे गोरगरिबांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा, हा मूळ हेतू डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे कट्टर महाराष्ट्र सैनिक, सानपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेश (भाऊ) मढवी यांच्या वाढदिवसानिमित्त श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून स्वस्त दरात म्हणजे फक्त ४० रुपये किलोने १००० किलो कांदा वाटप करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राबविलेल्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी सानपाडा विभागातील गोरगरीब जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती.

दिनांक – बुधवार, ११ डिसेंबर २०१९
वेळ – सकाळी ९.३० वा. ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत.
ठिकाण – हॉटेल गोल्डन पॅलेस चौक, पारसिक बँकच्या समोर, टेम्पो स्टॅन्ड, सेक्टर – ५, सानपाडा, नवी मुंबई – ४००७०५.
अटी –
१) हा उपक्रम फक्त सानपाडा विभागापूरताच मर्यादित राहिल.
२) कांदा खरेदीसाठी येताना पॅनकार्ड, आधारकार्ड तसेच मतदान ओळखपत्र सोबत घेऊन यावे.
३) प्रत्येकाला फक्त २ किलो कांदा खरेदी करता येईल.
४) कांदा खरेदी करण्यासाठी येताना सोबत कापडी पिशवी घेऊन यावे.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts