National Award for Red Ribbon Club of Siddhartha College | Aaplaa Vyaaspith news

Friday, January 17, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

सिध्दार्थ महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लबला राष्ट्रीय पुरस्कार

सिध्दार्थ महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लबला राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई (प्रतिनिधी) : सिध्दार्थ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत एच आय व्ही / एड्स बद्दल तरुणांमध्ये गेल्या १५ वर्षांपासून जनजगृती करत असलेल्या आमच्या रेड रिबन क्लबला जागतिक एड्स दिनाच्या दिवशी म्हणजेच, दि. १ डिसेम्बर, २०१९ रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बेस्ट रेड रिबन क्लब पुरस्काराने सन्मानित केले. या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरातील विविध महाविद्यालयात कार्यरत असलेल्या निवडक रेड रिबन क्लबला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. मुंबई व उपनगरातून सर्वोत्तम पाच महाविद्यालच्या रेड रिबन क्लबची सदर राष्ट्रीय पुरस्कारासाठी मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेकडून राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडे शिफारस केली होती, यामध्ये आमच्या महाविद्यालयासह के. सी. महाविद्यालय, भांडुपचे डी. ए. व्ही. महाविद्यालय, मालाडचे डी. टी. एस. एस. महाविद्यालय व प्रकाश रात्र महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लबचा समावेश होता. आमच्या महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी, प्रा. विशाल करंजवकर यांना महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्यासह प्रा. पंकज सरवदे यांनी आमच्या महाविद्यालयाचा पुरस्कार स्वीकारला.
गेल्या १५ वर्षांपासून सिध्दार्थ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या सहकार्याने रेड रिबन क्लब कार्यरत आहे. एच आय व्ही / एड्स, लैंगिकता व गुप्तरोग इत्यादी बद्दल तरुणांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कॉलेजच्या तरुण तरुणींमध्ये व दत्तक वस्तीत/ गावात जनजागृती करणे हा सदर रेड रिबन क्लबचा प्रमुख उद्धेश आहे. यामध्ये पथनाट्य, व्याख्याने, भित्तिपत्रक, घोषवाक्य, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, तज्ञांच्या कार्यशाळा इत्यादी कार्यक्रमांचा समावेश असतो.
मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. सुधीर पुराणिक साहेबानी पुरस्कार प्राप्त सर्व महाविद्यालचे कार्यक्रम अधिकारी व प्राचार्यांचे दूरध्वनीद्वारे मनापासून अभिनंदन व कौतुक केले. आमचे प्राचार्य डॉ. यु. एम. म्हस्के सरांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या च्या सर्व विद्यार्थ्यांचे व कार्यक्रम अधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts