Mumbai ranks as the main market for the most expensive prime assets, up 5.1% in 2014-18: Knight Frank report | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

मुंबईने सर्वाधिक महागड्या प्रमुख मालमत्तांची प्रमुख बाजारपेठ म्हणून स्थान राखले, २०१४-१८ दरम्यान किंमतीत ५.१% वाढ: नाइट फ्रँक अहवाल

मुंबईने सर्वाधिक महागड्या प्रमुख मालमत्तांची प्रमुख बाजारपेठ म्हणून स्थान राखले, २०१४-१८ दरम्यान किंमतीत ५.१% वाढ: नाइट फ्रँक अहवाल

मुंबई ( प्रतिनिधी ) :  नाइट फ्रँकच्या द वेल्थ रिपोर्ट – इनसाइट्स सीरिज २०१९ हाँगकॉंग हे शहर पुन्हा एकदा राहत्या जागांची जगातील सर्वात महागडी बाजारपेठ ठरले असून २०१८ मध्ये इथल्या प्रमुख मालमत्तांची किंमत सरासरी ४,२५१ अमेरिकन डॉलर्स प्रति चौ. फूट इतकी राहिली. जगभरातील विविध शहरांतील प्रमुख मालमत्ता बाजारपेठांमधील किंमतींत घडत गेलेल्या बदलांची नोंद करण्यावर या अहवालाचा भर होता.

लंडन आणि न्यू यॉर्क ही शहरे नाइट फ्रँक रँकिंग्जनुसार अत्यंत प्रबळ, अती-महत्वाच्या बाजारपेठांच्या यादीत दुस-या व तिस-या स्थानावर राहिली, जिथे सध्या जागांच्या सरासरी किंमती अनुक्रमे ३,०२२ अमेरिकन डॉलर्स आणि २,९८९ अमेरिकन डॉलर्स प्रति चौ. फूट इतक्या आहेत. मात्र लंडन बाजारपेठेबाबत अनपेक्षित बाब म्हणजे इथे २०१५ आणि २०१७ या काळात प्रमुख मालमत्तांच्या किंमतीत ७% घसरण होऊनही इथे २०१७ साली १५,१८४ अमेरिकन डॉलर्स प्रति चौ. फूट इतक्या जागेची विक्रमी विक्री झाली, जिची किंमत न्यू यॉर्कमध्ये २०१५ साली गाठल्या गेलेल्या सर्वाधिक किंमतीहून ३५% अधिक होती.

भारतामध्ये मुंबई हीच प्रमुख निवासी मालमत्तांची सर्वात महागडी बाजारपेठ ठरली, जिथे २०१९च्या पहिल्या तिमाहीमध्ये प्रमुख मालमत्तेची किंमत ९३१ अमेरिकन डॉलर्स प्रति चौ.फूट ( रु. ६४,६४९ प्रति चौ. फूट) राहिली. २०१८ साली प्रमुख मालमत्तांच्या किंमती सुमारे ९२६.१४ अमेरिकन डॉलर्स प्रति चौ. फूट इतक्या होत्या ( रु. ६४,४३२ प्रति चौ.फू). त्या तुलनेत या किंमतीत ०.३% वाढ झालेली दिसली.

दिल्लीमधील प्रमुख मालमत्तांच्या २०१८तील सरासरी किंमतींच्या तुलनेत २०१९च्या पहिल्या तिमाहीमध्ये ४.४% सर्वाधिक भाववाढ झाल्याचे दिसले. २०१९च्या पहिल्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार दिल्लीतील प्रमुख मालमत्तांची किंमत ४८२.५३ अमेरिकन डॉलर्स प्रति चौ. फूट. (रु. ३३,५०७ प्रति चौ.फूट) इतकी राहिली. दिल्लीतील प्रमुख मालमत्तांच्या किंमतींमध्ये २०१६ साली ४.९% घसरण झाली होती. २०१७ साली या किंमती आणखी २.७%घसरल्या व त्यानंतर २०१८मध्ये त्यांनी १.४ टक्क्यांची उसळी घेतली.

बेंगळुरूमधील प्रमुख मालमत्तांच्या सरासरी किंमतींमध्ये २०१८ साली ०.८% वाढ झाली व त्या २७७.३६ अमेरिकन डॉलर्स प्रति चौ. फूटांवर पोहोचल्या. (रु. १९,२९६ प्रति चौ. फूट). २०१९च्या पहिल्या तिमाहीतील आकडेवारीननुसार बेंगळुरूमधील प्रमुख मालमत्तांची किंमत २८०.४८ प्रति चौ.फूट (रु. १९,४७७ प्रति चौ. फूट) इतकी होती.

नाइट फ्रँक इंडियाचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर शिशिर बैजल यांच्या मते, गेल्या पाच वर्षांमध्ये भारतातील प्रमुख मालमत्तांच्या बाजारपेठांतील किंमती एकतर स्थिर राहिल्या आहेत किंवा त्यांत अगदी किरकोळ घसरण झाली आहे. २०१९च्या दुस-या सहामाहीमध्ये आलिशान मालमत्तांसह सर्व श्रेणींमधील जागांच्या किंमतींमध्ये किरकोळ वाढ होऊ शकेल. अॅटिट्यूड सर्वेक्षणानुसार भारतातील १४% अति-उच्च निव्वळ संपत्तीधारक व्यक्तींकडून २०१९ साली नवे घर विकत घेतले जाण्याची शक्यता आहे२०१९ मध्ये प्रमुख मालमत्तांना सुप्त मागणी असल्याचेच हे द्योतक आहे.” 

२०१४-१५ दरम्यान प्रमुख मालमत्तांच्या सरासरी किंमती:

स्थळ/वर्षमुंबईदिल्लीबेंगळुरू
चलनरु.रु.रु.
घराची किंमतचौ.फूचौ.फूचौ. फू
201461,30033,40018,600
201562,10034,07319,546
201663,90032,40519,546
201764,26931,65819,086
201864,43232,10719,296

स्त्रोत: नाइट फ्रँक रिसर्च

नाइट फ्रँकच्या रिसर्च विभागाचे ग्लोबल हेड लायम बेली म्हणाले, ” मी केलेल्या उत्साहपूर्ण भाकितामागे वेल्थ रिपोर्टसाठी केल्या गेलेल्या संशोधनाची प्रेरणा आहे. जागतिकीकरणाच्या संपत्तीचे जागतिकीकरण मालमत्ता बाजारपेठांना किती आणि कसा आकार देत आहे व प्रत्येक सर्वोत्तम मालमत्तेला असलेली मागणी कशाप्रकारे नव्या उंचीवर नेत आहे ही गोष्ट प्रत्येक वर्षागणिक अधिकाधिक स्पष्ट होत चालली आहे.

वेल्थ रिपोर्ट इनसाइट सीरिजमध्ये युरोप, अमेरिकाज आणि एशिया-पॅसिफिक या तीन क्षेत्रांमधील दहा ठळक आयलंड डेस्टिनेशन्स शोधली गेली आहेत. सर्वच आयलंड ग्रुप्सवरील रहदारीत वाढ झालेली असली तरीही २०१८ साली एशिया-पॅसिफिक क्षेत्रातील बेटांवर वाढलेल्या रहदारीत झालेल्या ८०% वाढीमुळे तिला चालना मिळाली आहे. केवळ फिलिपाइनस्मध्ये या वर्दळीत १५८%वाढ झाली. इथे २०१८ साली १,६३१ विमानफे-या झाल्या, २०१७ मधील केवळ ६३२ फे-यांच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. बोरा बोरा आणि कोह सामी येथे आलेल्या खासगी जेट विमानांच्या फे-यांत २०१८ मध्ये दुप्पट वाढ झाली.

इतर ठळक मुद्दे ( स्त्रोत: नाइट फ्रँक वेल्थ रिपोर्ट २०१९):

·         मुंबईतून निघालेल्या खासगी जेट्सची संख्या सुमारे १,५१६ इतकी म्हणजे दुबईहून निघालेल्या जेट्सच्या (१,४००) तुलनेत सुमारे ८.२८% अधिक तर टोकियोच्या (१,२०२) तुलनेत सुमारे २०% जास्त होती.

·         सर्वाधिक ६६,९६८ डिपार्चर्स ही न्यू यॉर्कमधून झाली. या यादीत मुंबईचा क्रमांक १४६ होता.

·         उत्तर अमेरिकेत (१३,६८५) कार्यरत बिझनस जेट्सची संख्या सर्वाधिक आहे.

·         युरोप, रशिया आणि कॉमनवेल्थ (CIS) देश कार्यरत बिझनेस जेट्सच्या संख्येच्या बाबतीत दुस-या क्रमांकावर आहेत (२,८७९) तर या क्रमवारीत त्याखालोखाल लॅटिन अमेरिका (७१८), एशिया-पॅसिफिक (४८७),मध्य-पूर्व (१९८) आणि आफ्रिका (१३५) यांचा समावेश आहे.

कृपया नोंद घ्यावी:

*२०१८ सालासाठीच्या आकडेवारीसाठी ३१ डिसेंबर २०१८ रोजी असलेले एक्स्चेंज रेट्स वापरण्यात आले आहेत.

*२०१९च्या पहिल्या सहामाहीच्या आकडेवारीसाठी ३१ मार्च २०१९ रोजी असलेले एक्स्चेंज रेट्स वापरण्यात आले आहेत.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts