१० सप्टेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या “भारत बंद”मध्ये कॉंग्रेस इंटककडून वाशी टोल वर आंदोलन

नवी मुंबई (सुर्यकांत गोडसे ) – कॉंग्रेस कडून पुकारण्यात आलेल्या १० सप्टेंबर रोजी “भारत बंद” मध्ये इंटककडून वाशी टोल येथे आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  यावेळी पोलिसांच्या समोर कॉंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टोल बंद करून रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला . यावेळी पोलिसांनी जयप्रकाश छाजड अध्यक्ष महाराष्ट्र इंटक, रवींद्र सावंत नवी मुंबई अध्यक्ष इंटक,यासीम तांबोळी ट्रान्सपोर्ट काँग्रेस इंटक अध्यक्ष  यांच्यासह  १३ पदाधिकाऱ्यांना अटक केली . या सर्वांवर गुन्हे दाखल करून त्यांना काल सायंकाळी  बेलापूर कोर्टात हजर केले असता त्यांची जामीन वर मुक्तता करण्यात आली

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!