MNS win victory !! Winning Glory at the Meet !!! | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

मनसेच्या विजयी भव !! मेळाव्यात विजयी जल्लोष!!!

मनसेच्या विजयी भव !! मेळाव्यात विजयी जल्लोष!!!

गजानन काळे यांना आमदार बनवण्यासाठी महाराष्ट्र सैनिकांनी घेतली विजयी संकल्प शपथ

नवी मुंबई (प्रतिनिधी) : बेलापूर मतदार संघाच्या निवडणूक प्रचारामध्ये मनसेचे अधिकृत उमेदवार गजानन काळे यांनी मुसंडी मारली आहे. आज विजयी भव मेळाव्यात प्रचंड संख्येने महाराष्ट्र सैनिक व नवी मुंबईकरांनी उपस्थित राहून विजयी संकल्प शपथ घेतली. महाराष्ट्रसैनिकांनी यानिमित्ताने बेलापुर विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले आहे अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपशहराध्यक्ष नितीन चव्हाण यांनी दिली.

रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी जुईनगर येथे आयोजित विजय संकल्प मेळाव्यात हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते, यावेळी व्यासपीठावर मनसे नेते अविनाश अभ्यंकर, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक , मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते रमेश परदेशी (मुळशी पॅटर्न फ्रेम पिट्या भाई) व बेलापुर विधानसभेचे मनसेचे उमेदवार गजानन काळे उपस्थित होते. सदर प्रसंगी मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील जनतेला दिलेल्या खोट्या आश्वासनाचा समाचार घेताना, असे म्हटले की, जे सरकार पाच वर्षात ६४ ते ६५ लाख झाडे लावणार होते तेच भारतीय जनता पक्षाचे सरकार आज आरे चे असणारे जंगल व त्यामधील झाडांची कत्तल ही रातोरात करीत आहे, व ही झाडे वाचण्यासाठी जे तरुण पुढे येत आहेत त्या तरुणांना तुरुंगात डांबण्याचे पाप भारतीय जनता पक्षाकडून होत आहे , याचा आपण सर्व सामान्य नवी मुंबईकर , आणि महाराष्ट्र व देशवासीय म्हणून निषेध करवा तितका थोडाच आहे. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी व कष्टकरी कामगार वर्गासाठी केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे सर्व विविध प्रशासनाच्या विरोधात लढा पुकारून शंभर ते दीडशे कोटी रुपये सर्वसामान्य नवी मुंबईकर जनतेच्या विकासाकरिता आणि त्यांच्या हक्काचा मोबदला त्यांना मिळवून देण्याकरिता वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या गजानन काळे यांना जर आपण सर्वांनी मिळून विधान भवनाच्या सभागृहात पाठवले तर नवी मुंबईच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जनतेचे प्रश्न हा राज साहेबांचा ढाण्या वाघ सभागृहांमध्ये तितक्याच प्रभावीपणे आणि अभ्यासू रित्या मांडेल असा विश्वास अभ्यंकर यांनी व्यक्त केला. आणि त्याच वेळी उपस्थित महाराष्ट्र सैनिकांनी जल्लोष व जयघोष केला .

मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना निवडणूकीच्या कार्याचा कानमंत्र याठिकाणी महाराष्ट्र सैनिकांना दिला, व यावेळेस गजानन काळेच बेलापुर विधानसभे मधून आमदार बनतील असा विश्वास व्यक्त केला. सदर प्रसंगी मराठी सिने कलावंत रमेश परदेशी यांनी उपस्थितांना संबोधित करताना असे म्हटले की गजानन काळे ही अशी एकमेव व्यक्ती मी माझ्या जीवनात बघितली की पहिल्याच भेटीमध्ये ती अत्यंत जिव्हाळ्याची वाटू लागते, व आपण सहज रित्या त्यांचे मित्र होतो , कारण की सर्वसामान्य तरुणांचे प्रश्न जाणणारा, समजून घेणारा आणि ते सोडवण्यासाठी काम करणारा जर कोणी अभ्यासू आणि लढवय्या कार्यकर्ता असेल तर तो फक्त गजाननच आहे आणि तुमच्या आणि माझ्या मधला सर्वसामान्य तरुण हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जावो या शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. !! विजयी भव !! म्हणत त्यांनी गजानन काळे यांना शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी उपस्थित महाराष्ट्र सैनिक व मुंबईकर नागरिकांमध्ये नवचैतन्याची लाट पसरली व त्यांनी टाळ्या आणि यंदा गजानन काळे आहे अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडला असे सह सचिव सचिन कदम यांनी सांगितले.

यावेळी बेलापुर विधानसभेचे मनसेचे उमेदवार गजानन काळे यांनी त्यांचा राजकीय प्रवासाचा खडतर आलेख उपस्थित महाराष्ट्र सैनिकां समोर मांडत, असा निर्धार व्यक्त केला की गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य नवी मुंबईकर जनतेसाठी केलेल्या कार्याची आठवण आजही आपल्या स्मरणात आहे , व विजय आपला नक्कीच आहे, असा संकल्प याप्रसंगी गजानन काळे यांनी केला.

विजय संकल्प मेळाव्याचे सर्वात मोठे वेगळेपण तिथे उपस्थित महाराष्ट्र सैनिकांनी मनसे नेते मा अविनाश अभ्यंकर व उमेदवार गजानन काळे यांच्या साक्षीने बेलापूर विधानसभा जिंकण्यासाठी घेतलेली विजयी संकल्प शपथ हे आहे , कारण गजानन काळे यांचे आज पर्यंतचे कार्य अधोरेखित करणारी शपथ महाराष्ट्र सैनिकांनी घेतली. अशी माहिती उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे यांनी दिली.

सदर प्रसंगी महाराष्ट्र सैनिकांनी गजानन काळे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली यंदा गजाननच आहे, नवे पर्व, गजानन सर्व अशा अनेक घोषणांनी सभागृह दुमदुमून सोडला. यावेळी विजय संकल्प मेळाव्याच्या व्यासपीठावर मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर, मनसेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक, मराठी सिने कलावंत रमेश परदेशी,मनसे ऐरोली विधानसभेचे अधिकृत उमेदवार निलेश बाणखेले, मनसेचे उपशहर अध्यक्ष नितीन चव्हाण, विनोद पार्टे , संदीप गलुगडे , मनसे विद्यार्थी सेना रायगड जिल्हा अध्यक्ष अक्षय काशीद व नवी मुंबईशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, मनसे महिला सेना आरती धुमाळ , अनिथा नायडू ,मनसे कामगार सेनेचे शशिकांत कळसकर, महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कर्मचारी कामगार सेनेचे आप्पासाहेब कोठुळे, रस्ते व अस्थापना विभाग मनसे शहर संघटक स्वप्निल घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
विजय भव मेळाव्याचे सूत्रसंचालन , शहर सचिव श्रीकांत माने यांनी केले.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts