Meeting with Municipal Commissioner MLA Manda Mhatre with BJP corporators | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

आमदार सौ.मंदा म्हात्रे यांची भाजपा नगरसेवकांसमवेत महापालिका आयुक्तांबरोबर भेट

आमदार सौ.मंदा म्हात्रे यांची भाजपा नगरसेवकांसमवेत महापालिका आयुक्तांबरोबर भेट

राज्यातील ओला दुष्काळावर तसेच बेलापूर मतदारसंघातील नागरी समस्यांवर केली चर्चा महापौरांनाही दिले पत्र  

नवी मुंबई(प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात ओला दुष्काळ पडल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत मदत मिळावी, तसेच बेलापूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक प्रभागांमध्ये प्रलंबित असलेल्या नागरी समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्या याकरिता आज बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी भाजपा नगरसेवक व पदाधिकारी यांच्यासह नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेतली. तसेच नवी मुंबई महापौर जयवंत सुतार यांना सदरबाबत पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, विजय घाटे, डॉ.राजेश पाटील, संपत शेवाळे, सुनील पाटील, डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, सुरेश कुलकर्णी, नेत्रा शिर्के, तनुजा मढवी, सलुजा सुतार, सुरेश शेट्टी, शिल्पा कांबळी, रुपाली भगत, संदीप सुतार, दत्ता घंगाळे, भरत जाधव, राजू तिकोने उपस्थित होते. यावेळी राज्यात पडलेल्या ओल्या दुष्काळावर मात करण्यासाठी राज्याच्या अनेक भागातून मदत होत असताना एक कर्तव्य म्हणून नवी मुंबई महापालिकेनेही हातभार लावावा याकरिता पत्र देण्यात आले असून नवी मुंबई शहर झोपडमुक्ती बनविण्याबाबत चर्चा करण्यात आली. उपस्थित नगरसेवकांनी सांगितलेल्या आपापल्या प्रभागातील समस्यांवरही यावेळी दीर्घकाळ चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रभागातील अस्वच्छता, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, एनआरआय व नेरूळ हायवे येथे ओव्हरब्रिज बांधणे, ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे बटरफ्लाय उद्यान विकसित करणे, राजीव गांधी स्टेडीयमची डागडुजी, नवी मुंबईतील पार्किंग समस्या, सर्व प्रभागातील उद्याने व तलावाची दुरावस्था, अनधिकृत फेरीवाल्यावर अधिकाऱ्यांचाच वरदहस्त असल्याने त्यांच्यावर वचक ठेवणे, प्रत्येक प्रभागातील पालिकेचे सुरु असणारे निकृष्ट दर्जाची कामे, आमदार निधीतून देण्यात आलेले स्वच्छता गृहांची झालेली दुरावस्था, सर्व परवानगी एकाच कक्षेत यावे याकरिता एक खिडकी योजना, अनेक इमारतीवर असणारे अनधिकृत मोबाईल टॉवर बंद करणे, नाल्यांमध्ये झालेले घाणीचे साम्राज्य अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

        यावेळी आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे हाती येणारे पीकदेखील पाण्यात वाहून गेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा नैसर्गिक संकटकाळात त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. नवी मुंबई महानगरपालिका ही राज्यातीलच नव्हे तर देशातील श्रीमंत महापलिका म्हणून गणली जात असल्याने या महापालिकामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधी माध्यमातून सहाय्य करावे, असे पत्र महापौर जयवंत सुतार व पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना दिले आहे. नवी मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी याबाबत चर्चा करण्यात आली असून बेलापूर मतदारसंघातील भाजपचे सर्व नगरसेवक यांनी आप-आपल्या प्रभागातील समस्या व मागण्या आयुक्तांसमोर कथन करताच आयुक्त स्वत: प्रत्येक प्रभागनिहाय स्थानिक लोकप्रतिनिधीसह दौरा करून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.    

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts