Maharashtra Legislative Council issues notification to the Governor tomorrow | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

महाराष्ट्र विधानपरिषदेचे अधिवेशन उद्या,राज्यपालांकडून अधिसूचना जारी

महाराष्ट्र विधानपरिषदेचे अधिवेशन उद्या,राज्यपालांकडून अधिसूचना जारी

मुंबई ( विशेष प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 174, खंड (1) अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र विधानपरिषदेची बैठक रविवार, दिनांक 01 डिसेंबर, 2019 रोजी सायंकाळी 04.00 वाजता विधानभवन, मुंबई येथे भरविण्याचे ठरविले आहे.

विधानपरिषदेच्या या बैठकीसंबंधीची अधिसूचना/आवाहनपत्र (समन्स) विधानपरिषदेच्या सर्व सदस्यांना पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेची बैठक विधान भवन, मुंबई येथे सायंकाळी 04.00 वाजता सुरु होईल. तरी विधानपरिषदेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी विधान भवन, मुंबई येथील विधानपरिषदेच्या अधिवेशनासाठी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार), राजेंद्र भागवत यांनी आवाहनपत्राद्वारे केले आहे. विधानपरिषदेच्या उपरोक्तप्रमाणे बैठकीसंबंधीची अधिसूचना/आवाहनपत्र (समन्स) इत्यादी सर्व कागदपत्रे विधानपरिषद सदस्यांना त्यांच्या ई-मेल पत्त्यावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर सदर प्रती महाराष्ट्र विधिमंडळाच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार), राजेंद्र भागवत यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी याबाबतची अधिसूचना शुक्रवार, दिनांक 29 नोव्हेंबर, 2019 रोजी काढली आहे.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts