Mahakavi Kalidas Pratishthan inaugurates the function of Mumbai Thane District Branch | Aaplaa Vyaaspith news

Friday, November 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

महाकवी कालिदास प्रतिष्ठान मुंबई ठाणे जिल्हा उपशाखेचा उद्घाटन सोहळा यशोधन संपन्न

महाकवी कालिदास प्रतिष्ठान मुंबई ठाणे जिल्हा उपशाखेचा उद्घाटन सोहळा यशोधन संपन्न

   ठाणे(प्रतिनिधी) : महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे च्या ठाणे शाखेचे उद्घाटन मुख्य संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष महान साहित्यिक व भावकवी वि.ग.सातपुते यांचे हस्ते व प्रमुख अतिथी मुख्य संस्थेचे उपाध्यक्ष व हिंदी साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.महेंद्रजी ठाकूरदास तसेच ठाण्याचे सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.आदित्य दवणे,  मुंबई-ठाणे जिल्हा समन्वयक जयंत भावे, सहसमन्वयक डॉ .श्री.योगेश जोशी व ठाणे शाखा अध्यक्ष डॉ .शंकर(राज) परब, ठाणे कार्याध्यक्षा सौ.आरती कुलकर्णी यांचे  उपस्थितीत संपन्न  झाला.
       संकल्प इंग्लिश स्कूल ठाणे येथे आयोजित या कार्यक्रमामध्ये शारदा व महाकवी कालिदास यांचे प्रतिमा पूजना नंतर सुप्रसिद्ध गायिका सुनीता काटकर यांच्या सुरेल ईशवंदनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला .उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन शाखेचे सहसमन्वयक डॉ. योगेश जोशी व काव्य वाचन स्पर्धेचे सूत्र संचालन सचिव अंजुषा पाटील यांनी उत्तम प्रकारे केले.
     कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. वि.ग.सातपुते ( आप्पा ) यांनी साहित्य हे वैश्विक आहे.ही एक तपश्र्चर्या आहे आपण साधक आहोत असे सांगितले.तर डॉ.महेंद्र ठाकुरदास यांनी महाकवी कालिदास व त्यांच्या साहित्या विषयी महत्वपूर्ण माहिती दिली.प्रा.आदित्य दवणे यांनी काव्यलेखन व मातृभाषा यांचा जवळचा व प्रभावी संबंध कसा आहे हे थोडक्यात सांगितले.अध्यक्ष डाॕ.श्री.शंकर(राज) परब यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कवी विषयी सांगताना म्हटले की हिमालयाच्या शिखारापासून ते समुद्राच्या तळापर्यंत चा ठाव ज्याला कळतो तो खरा कवी.      उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून कु.मानसी कुलकर्णी  व कु.साक्षी परब यांच्या कौतुकास्पद साहित्यिक व सामाजिक कार्याबद्दल त्यांना लक्षवेधी पुरस्काराने गौरवण्यात आले.तसेच महाकवी कालिदास प्रतिष्ठानच्या मुंबई प्रदेश ठाणे जिल्हा उपशाखेच्या सदस्या जयमाला वाघ व उपाध्यक्षा सौ. गीता केदारे यांना महाकवी कालिदास काव्यगौरव पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.      मुंबई- ठाणे विभागातील नवोदित कवींना एक व्यासपीठ मिळावे यासाठी काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली .या स्पर्धेत  ठाणे जिल्ह्यातील  ४१ कवींचा सहभाग होता.काव्यवाचन स्पर्धेचे परिक्षक म्हणून जेष्ठ साहित्यिक व कवी प्रा.वसंत बिवरे,पुणे व प्रा.जयंत देशपांडे ,पुणे यांनी अत्यंत पारदर्शक पद्धतीने परिक्षण केले.काव्यवाचनामध्ये प्रथम – मनीष मालुसरे,द्वितीय- धनाजी बुटेरे, तृतीय-संध्या देशपांडे यांना   मानचिन्हाने आणि उत्तेजनार्थ- भैरवी चितळे व प्रज्ञा पंडित यांना पुस्तक व प्रमाण-पत्र प्रदान करुन गौरविण्यात आले.सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाण-पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
      हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास मुंबई-ठाणे विभाग प्रमुख श्री.जयंत भावे, सहविभागप्रमुख  डॉ योगेश जोशी यांचे नेतृत्वाखाली व शाखेचे अध्यक्ष डॉ.राज परब , कार्याध्यक्षा आरती कुलकर्णी , संकल्प इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका व कार्यकारिणी सदस्या डॉ.ज्योती परब , उपाध्यक्षा गीता केदारे, उपकार्याध्यक्ष अॕड.रुपेश पवार व विलास अधिकारी, सचिव अंजुषा पाटील,उपसचिव अभय खोपकर , खजिनदार धनश्री क्षीरसागर तसेच सर्व सदस्य जयमाला वाघ,  ख.र. माळवे, हेमंत नेहेते, रमेश तारमळे,सुरेश्वर शुक्ल , सुनिता काटकर यांनी तन-मन-धनाने उत्फूर्तपणे मदत व सहकार्य  केले तसेच सर्व सहभागी कवी स्पर्धकांचे उत्तम प्रतिसादाने हा कार्यक्रम सर्वांग सुंदर पार पडला.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts